आषाढी एकादशी वारी निमीत्त शालेय वातावरणात रंगला पालखी रिंगण सोहळा*

*आषाढी एकादशी वारी निमीत्त शालेय वातावरणात रंगला पालखी रिंगण सोहळा*
*जिल्हा परीषद धानोरे आदर्श शाळेची वारी आळंदी नगर परिषद शाळा नंबर दोन ची हि दिंडी आळंदी प्रदक्षिणा*
आळंदी/धानोरे ता.खेड आषाढी एकादशी निमित्त रिंगण सोहळ्याचे आयोजन मुख्याध्यापक श्री सत्यवान लोखंडे आणि शिक्षक , शिक्षिका यांचे प्रयत्नात करण्यात आले होते. शाळेच्या प्रांगणात ज्ञानोबा माऊली तुकाराम ….श्री विठ्ठलाच्या गजरात आपसूक पंढरीचे दर्शन धानोरे आदर्श जिल्हा परिषद शाळा येथे अनुभवयास आले. पंढरी ला जायची ओढ आहे आणि अडचणी असंख्य आहे अश्या स्थितीत शाळेतील या मनमोहक दृश्याने मन दुखावले… पंढरपुरा नेईन गुढी….. ही आशा हि आस्था जपत हा मनमोहक दृष्याने डोळे दिपले. आणि पंढरपूरच्या आठवणी ने डोळे पाणावले ही…आषाढी वारीची ओढ , आषाढी वारी ची आस मुखात विठ्ठल विठ्ठल आपसूक च जपत हा सोहळा ते रिंगण अनुभवताना तो विठ्ठल अठ्ठावीस युगे विटेवरी उभा डोळ्यासमोर येऊन ठाकला…. आळंदी नगरपरिषद शाळा नंबर 2 ने हि आळंदी देवाची नगर प्रदक्षिणा करतं दिंडी काढली होती