वडगाव ढोक येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व राम कथा उत्साहात संपन्न

वडगाव ढोक येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व राम कथा उत्साहात संपन्न
गेवराई तालुक्यातील वडगाव ढोक येथे गेल्या अनेक वर्षांची परंपरा असलेला ग्रामदैवत हनुमान जन्म उत्सव सोहळ्यानिमित्त गुरूवार पासून ते गुरुवार पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व राम कथा चे आयोजन करण्यात आले असून पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या सोहळ्यास सहभागी होण्याचे आवाहन गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
अनेक वर्षांची परंपरा असलेला अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्या निमित्त गुरुवार पासून अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व राम कथेचा प्रारंभ होत आहे. या हरिनाम सप्ताहात किर्तनकार
वार गुरुवार रोजी सायंकाळी 9ते11या वेळेत
(1)श्री. ह. भ. प.पु.1008स्वामी त्रिविक्रमानंद शाश्री(श्री गणेशायनंदन गड,ईंदुवासिनी पिंपळनेर)
शुक्रवार
(2)श्री ह.भ.प. शिवाजी महाराज शेळके (बारामती)
शनिवार
(3)श्री ह.भ.प. गहिनीनाथ महाराज खेडकर (घाटसीळ पारगाव)
रविवार
(4)श्रीह.भ.प. आदिनाथ महाराज लाड (आळंदी देवाची)
सोमवार
(5)श्री ह.भ.प.
विष्णुदेवानंद भारती (मनेश्वर संस्थान तळेवाडी)
मंगळवार
(6)श्री ह.भ.प.महंत वेदांतचार्य स्वामी विवेकानंद शाश्री (सिध्देश्वर संस्थान शिरुर कसार)
बुधवार
(7)श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाचे महंत
(8) श्री ह.भ.प.डॉ न्यायचार्य नामदेव महाराज शास्त्री भगवान गडकर यांचे काल्याचे किर्तन होईल व नंतर महाप्रसाद
अखंड हरिनाम सप्ताहास पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन गावकऱ्यांनी केले आहे