टाकळीभान परिसरात मुलांना पळविणारा पकडला

टाकळीभान परिसरात मुलांना पळविणारा पकडला
श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथे लहान मुलांना पळवून नेणार्या एका
पोरधर्यास टाकळीभान ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले असून या झालेल्या घटनेमुळे टाकळीभान येथे मोठी खळबळ उडाली आहे.
या बाबत माहिती अशी की, आज दिनांक १६ रोजी दुपारी दिड वाजेच्या दरम्यान येथील खळवाडी
परिसरातील रामेश्वर शिंदे यांची ७ वर्षाची इयत्ता दुसरी
मध्ये शिकणारी कु. कांचन रामेश्वर शिंदे ही मुलगी घराबाहेर खेळत असतांना या मुलीस बाजाठाण. तालूका. वैजापूर. जिल्हा. संभाजी नगर येथील अनिल पोपट निकम वय २३ वर्ष याने मुलीस पळविण्याचा प्रयत्न केला असता या मुलीने आरडा ओरड केल्याने या मुलीची आई बाहेर आली व भामट्याला पकडले मात्र हाताला झटका देवून हा पोरधरी पळून गेला. या मुलीच्या आधी त्याने कु. स्वरा राकेश येवले या मुलीला पळविण्याचा प्रयत्न केला मात्र ही मुलगी घरात पळून गेल्याने त्याचा हा प्रयत्न फसला त्यानंतर त्याने रामेश्वर शिंदे यांच्या मुलीला पळविण्याचा प्रयत्न केला तोही प्रयत्न फसला.
पोर धरणारा गावात आलेला असून एका मुलीस
पळविण्याचा प्रयत्न झाला व या भामट्याचे पेहरावाचे
वर्णन सोशल मिडीयावर टाकण्यात आल्याने लोक सर्तक झाले. व या परिसरातील ग्रामस्थांनी या
भामट्याचा शोध घेण्यास सुरूवात केली. ग्रामस्थानी अखेर शोध घेवून या पोरधर्याला भोकर परिसरातील जगताप वस्ती परिसरात पकडले व चांगला चोप दिला असता त्याने त्याचे नाव, गाव सांगितले. या पोरधर्याला ग्रामस्थ सचिन नागले, किरण मेहेत्रे, सुनिल येवले, गणेश शिंदे, गजानन सावंत, लाला मैड, रमेश पेहरकर, विवेक शिंदे यांनी पकडून पोलासांच्या ताब्यात दिले आहे. या बाबत अधिक तपास पोलिस करीत आहेत. आज झालेल्या या घटनेमुळे टाकळीभान येथे मोठी खळबळ उडाली असून भितीचे वातावरण पसरले आहे.