गुन्हेगारी

अखेर त्या महिलेचा म्रुत्यु अकस्मात नव्हे तर खुन झाल्याचे निष्पन्न..

अखेर त्या महिलेचा म्रुत्यु अकस्मात नव्हे तर खुन झाल्याचे निष्पन्न..

 

– दि. १४ मार्च रोजी सोनई जवळील नाईक वस्ती​ येथे एक महीला म्रुत अवस्थेत असल्याची​ खबर फोन द्वारे सोनई पोलीस स्टेशनला आल्याने. घटनेची खातरजमा करण्यासाठी​ मा. उप विभागीय अधिकारी संदिप मिटके,शिंगणापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे, सोनई पोलीस स्टेशनचे राजेंद्र थोरात, यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी भेट देऊन पहाणी करून रितसर पंचनामा करत म्रुतदेह उत्तरीय तपासणी साठी नेवासा येथे पाठविण्यात आला. प्रथम दर्शी अकस्मात म्रुत्यु ची नोंद करण्यात आली होती. उत्तरीय तपासणी अहवाल​ आल्यानंतर मयत महिलेच्या भावाने सोनई पोलीस स्टेशनला समक्ष येऊन रितसर फिर्याद दिली कि माझ्या बहिणीचा विवाह २२ वर्षापूर्वी अरुण माळी याच्या सोबत झाला होता. दरम्यानच्या काळात अरुण यास दारुचे व्यसन लागले.

तो नेहमीच बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेवून वेड्याच्या भरात मारहाण करत असे. दि. १४ मार्च रोजी फिर्यादी यास त्यांचा भाचा अक्षय संजय माळी याने​ फोनवर सांगितले कि मला सोनई येथुन लीलाबाई पवार हिने कुसुम हीस तिच्या नवऱ्याने घराजवळील शेतात नेवुन मारहाण करत ठार मारले असल्याचे सांगितले. मि प्रत्यक्ष सोनई येथे येवून पहाणी केली असता माझ्या बहिणीच्या अंगावर मारहाणीच्या खुना दिसत होत्या.

आम्ही माझा मेव्हणा अरुण तारु माळी यास घेऊन सोनई पोलीस ठाण्यात येऊन रितसर फिर्याद दिली असल्याचे मयत महिलेच्या भावाने सांगितले. सदरील फिर्यादी वरुन मयत महिलेच्या पती विरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात ११८/२०२३भाद वि ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सोनई पोलीस करत आहे.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे