गुन्हेगारी

राहुरीतील साळवे दिव्यांग कुटुंबाला मारहाण दिव्यांग अधिकार कायदा २०१६ मधील कलम ९२ नुसार गुन्हा दाखल

राहुरीतील साळवे दिव्यांग कुटुंबाला मारहाण

दिव्यांग अधिकार कायदा २०१६ मधील कलम ९२ नुसार गुन्हा दाखल

राहुरी ता/ प्रतिनिधी : काय रे तु लय माजलास का, तुला या अगोदर आर्म अॅक्ट गुन्ह्यात एक महिना जेलमध्ये ठेवले होते. असे म्हणत साळवे यांना शिवीगाळ करून जबर मारहाण केल्याची घटना राहुरी शहरातील राजवाडा येथे दि. ६ फेब्रुवारी रोजी घडली आहे. त्यानुसार तिघांविरोधात दिव्यांग अधिकार कायदा २०१६ मधील कलम ९२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सचिन दौलत साळवे (वय ३९ वर्षे, रा. राजवाडा, राहुरी, ता. राहुरी,) यांनी राहुरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पत्नी राजश्री, मुलगी रोमा, नेहा, पंकजा, हर्षदा व मुलगा आदेश असे एकत्र राजवाडा, राहुरी येथे राहत आहे. तसेच मी जन्मता पायाने ७४ टक्के अपंग असल्याने मजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो आणि माझी मुलगी रोमा देखील पन्नास टक्के अपंग आहे.

 

दि.६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास मी ऋषभ किराणा दुकान, राजवाडा येथे तेल आणण्यासाठी गेलो असता तेथे सुधाकर जोसेफ साळवे, साहिल सुधाकर साळवे, मंगल सुधाकर साळवे (तिघे रा. मल्हारवाडी रोड, राहुरी) हे तेथे आले व मला म्हणाले की, अरे काय रे तु लय माजलास का, तुला या अगोदर आर्म अॅक्ट या गुन्ह्यात एक महिना जेलमध्ये ठेवले होते. असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर मी माझ्या राहात्या घरी आलो असता तेथे ते लाकडी दांडा घेऊन आले. माझ्यासह माझ्या पत्नीला केस धरुन जबर मारहाण केली व चार मुलींना देखील लाथाबुक्क्याने मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच यापुर्वी तीनही साळवे यांनी अनेकावेळा मारहाण व दमदाटी केली आहे.

 

सचिन साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुधाकर जोसेफ साळवे, साहिल सुधाकर साळवे, मंगल सुधाकर साळवे (रा. मल्हारवाडी रोड, राहुरी) यांच्याविरोधात चार मुलींना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्याने मारहाण व जिवे मारण्याची धमकी तसेच दिव्यांग अधिकार कायदा २०१६ मधील कलम ९२ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

 

पुढील तपास पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलिस करीत आहे.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे