आरोग्य व शिक्षण

राहुरी पंचायत समिती खेळते नागरिकांच्या आरोग्याशी – देवेंद्र लांबे

राहुरी पंचायत समिती खेळते नागरिकांच्या आरोग्याशी – देवेंद्र लांबे

 

 

राहुरी पंचायत समिती येथे शिवसेना तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे हे काही कामा निमित्त गेले असता पंचायत समिती परिसरातील ढिसाळ कारभारा विषयी नाराजी व्यक्त केली.श्री.लांबे व त्यांचे सहकारी पंचायत समिती राहुरी येथे गेले असता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेल्या ठिकाणी पाहणी केली असता परीसरा मध्ये प्रचंड प्रमाणात घाणीचे साम्राज्य दिसून आले.

 

श्री.देवेंद्र लांबे हे पाणी पिण्यासाठी त्या ठिकाणी गेले असता पिण्याचे पाणी देण्यासाठी पाणी शुद्धीकरणा साठी अत्याधुनिक मशनरी बसविलेली आहे.परंतु केवळ लोकांना दाखविण्यासाठी भिंतीवर मशीन बसविलेले आहे.ते मशीन बंद स्वरुपात असल्याचे निदर्शनात आल्यानंतर पाणी साठवण्यासाठी जे मशीन आहे ते उघडून पहिले असता मोठ्या प्रमाणावर घाण त्या मशीन मध्ये दिसून आली.पाणी साठवण करण्यासाठी जे मशीन बसविण्यात आले त्याच्या वरील आवरण देखील तुटलेले होते.त्या आवरणा मधून विषारी किडे,अथवा जीव त्यात पडल्याची श्यक्यता नाकारता येत नाही.

 

यावेळ शिवसेना तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे यांनी सदर परिस्थिती प्रभारी गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर यांना निदर्शनास आणून दिली असता,पाटेकर म्हणाले कि मी प्रभारी म्हणून राहुरी पंचायत समिती येथे आलेलो आहे.सध्या राहुरी येथे बाळासाहेब ढवळे हे काम पाहतात.

 

राहुरी पंचायत समिती ढिसाळ कारभारा विषयी मोठ्या प्रमाणवर संताप व्यक्त केला जात आहे.अधिकारी लोक केवळ उडवाउडवीचे उत्तर देतात.राहुरी पंचायत समिती पूर्ण तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी सरपंच यांना ग्रामसमृद्धीचे उपदेश पाजतात व यांच्याच कार्यलयात ढिसाळ कारभार चालतो हे दिसून येत आहे.

 

लांबे म्हणाले कि राहुरी पंचायत समितीच्या ढिसाळ कारभाराची चौकशी करून सबंधित गटविकास अधिकारी धावले व प्रभारी गटविकास अधिकारी पाटेकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस,पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील,जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे लांबे म्हणाले.

 

या प्रसंगी शिवसेनेचे तालुका संघटक अशोक तनपुरे.शेतकरी आघाडीचे तालुका प्रमुख किशोर मोरे उपस्थित होते.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे