जगातली युद्ध संपून मानवतावादी वृत्त्ती टिकली पाहिजे… डॉ. श्रीपालजी सबनीस

जगातली युद्ध संपून मानवतावादी वृत्त्ती टिकली पाहिजे… डॉ. श्रीपालजी सबनीस
टाकळीभान प्रतिनिधी. : जगात चाललेली युद्ध संपून मानवजाती जातीच्या अस्तित्वासाठी जगात शांतता नांदण्याची गरज आहे असे प्रतिपादन ८९ वे अखिल भारतीय संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले
टाकळीभान येथील पहिले मराठी ग्रामीण साहित्य संमेलन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी संमेलनाध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पुरोगामी साहित्यिक आमदार लहुजी कानडे, ह भ प शिवाजी महाराज देशमुख संत ज्ञानेश्वर संस्थान श्रीक्षेत्र नेवासा, संमेलनाच्या स्वागताध्यक्ष डॉ. वंदनाताई मुरकुटे, चित्रपट गीतकार कवी बाबासाहेब सौदागर,मा. प्राचार्य अविनाश सांगोलेकर,ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये, प्रो. डॉ. रवींद्र ठाकूर, डॉ शिरीष लांडगे, कवयित्री संजीवनी तडेगावकर, डॉ. ऋषिकेश कांबळे,मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. संदीप सांगळे, ज्येष्ठ साहित्यिक सुभाष सोनवणे, ज्येष्ठ साहित्यिक कवी अनंत कराड, राज्य आदर्श शिक्षक अनिल लोखंडे सर, प्राचार्य डॉ. शंकरराव अनारसे, प्राचार्य टी ई.शेळके, कवी पोपटराव पटारे, प्रा. डॉ. वसंतराव शेंडगे, प्रा. बाळासाहेब लेलकर, प्रमुख उपस्थितीत होते.
यावेळी ना सबनीस म्हणाले की जगात चालेली अगीकता, युद्ध रणगाडे, शस्त्रसाठा वाढवण्याची स्पर्धा, वर्चस्वासाठी वाढलेली क्रूरता, ही मानव जातीला घातक असून लोप पावत चाललेली मानवतावादी भावना ,विचार यावर साहित्यकांनी लेखन करावे, आपले परखड विचार मांडावे, यातून समाजाच्या मनोवृत्तीत बदल होईल. जातीच्या नावाखाली विखुरलेली, वाटलेली मानसिकता बदलून प्रत्येकाकडे एक माणूस म्हणून बघण्याचा, जगण्याचा विचार हवा आहे. त्याचप्रमाणे सर्व थोर पुरुषांचे विचारतत्व हे सारखेच असून त्यांनी समाजाच्या हिताचा उपदेश केला आहे.
याप्रसंगी आमदार लहू कानडे म्हणाले की जगात चाललेल्या वास्तविकतेचे दर्शन संमेलनातून घडते,व चोर दरोडेखोर होण्यापेक्षा कवी होणे कधीही चांगले, कारण कविता कोणाचे कधी वाईट करत नाही ती फक्त आपला अंतर्मनाचा भाव दर्शवते असे ते म्हणाले. यावेळी ह भ प शिवाजी महाराज देशमुख यांनी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या संयोजकाचे कौतुक करून आपण संमेलनाद्वारे नवीन कवी, साहित्यिकांच्या पंखात बळ भरण्याचे काम केल्याचे म्हणाले. प्रारंभी संमेलनाच्या स्वागतध्यक्षा डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे व संमेलनार्थींचे स्वागत केले, तसेच टाकळीभान गावास पौराणिक वारसा असून येथील पुरातन विठ्ठल रुक्मिणीचे देवस्थान व इतिहासाबद्दल उपस्थितांना माहिती दिली या ठिकाणी ग्रामीण साहित्य संमेलन पार पडत असल्याने त्यास विशेष महत्त्व प्राप्त झाल्याचे सांगितले. अर्जुन राऊत यांनी उपस्थितांचे आभार मानले, या कार्यक्रमाला साहित्य प्रेमी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते,