गुढी पाडवा डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आनंदाचा शिधा मंत्रिमंडळाचा निर्णय

गुढी पाडवा डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आनंदाचा शिधा मंत्रिमंडळाचा निर्णय
बेलापुर (प्रतिनिधी )-दिपावली प्रमाणेच गुढी पाडवा व डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त महाराष्ट्र शासनाने गोरगरीब जनतेला शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा धाडसी निर्णय घेतला असुन या निर्णयामुळे जनतेचा सण गोड होणार आहे सर्व सामान्य नागरीकांची दिवाळी गोड व्हावी या करीता शासनाने शंभर रुपयात एक लिटर पामतेल एक किलो रवा एक किलो साखर एक किलो हरभरा दाळ देण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे सर्व सामान्य नागरीकांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला होता आता नविन मराठी वर्ष सुरु होत आहे पहीलाच सण गुढी पाडवा आहे तसेच महामानव डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीही जयंती आहे त्यामुळे नागरीकांना हे ही सण आनंदात साजरे करता यावेत या करीता राज्यातील एक कोटी ६३ लाख कुटुंबांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे दिपावली सणाच्या कालावधीत अनेक ठिकाणी आनंदाचा शिधा उशिराने पोहोचला होता परंतु आता शासनाने वेळेत हा शिधा पोहोच करण्याची खबरदारी घ्यावी अशीच सर्व सामान्य नागरीकांची मागणी आहे