राहुरीच्या मुळा नदीपात्रातून डिग्रस व केटी वेर जवळील राहुरी खुर्द हद्दीतून रात्रंदिवस बेसुमार वाळू उपसा सुरू असल्याने याकडे राहुरी महसूल व पोलीस प्रशासचे दुर्लक्ष होत आहे..

राहुरीच्या मुळा नदीपात्रातून डिग्रस व केटी वेर जवळील राहुरी खुर्द हद्दीतून रात्रंदिवस बेसुमार वाळू उपसा सुरू असल्याने याकडे राहुरी महसूल व पोलीस प्रशासचे दुर्लक्ष होत आहे..
बारागाव नांदूर डिग्रस के टी वेअर् नर्सरी परिसर हद्दीतून रात्रंदिवस बेसुमार वाळू उपसा सुरू असून वाळूचा उपसा करताना पोकलेन यारी याचा वापर होत असून चार चाकी वाहनांच्या साह्याने वाहतूक सुरू आहे या वाळू उपसा मुळे नदीपात्रात मोठी खड्डे पडले असून या खड्ड्यातील पाण्याचा माणसांना अंदाज येत नसल्याने अनेकांना आपला जिव गमवावा लागला आसल्याच्या घटना घडल्या आहे बारागाव नांदुर ते डिग्रस या
दोन्ही गावाच्या दळण वळणच्या माध्यमातून महत्वाचा आसणारा रस्त्यावरून सुससाट वेगाने वाळूचे डंपर जात आसल्याने रस्त्याची चाळण झाली आहे.
वाळू वाहतूक करणारी वाहने नर्सरी परिसर मार्ग बारागाव नादुर डिग्रस हद्दीतून वेगाने जात असल्यामुळे रस्त्याचे तीन तेरा वाजले आहे. शिवरस्ता या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडली असल्यामुळे व त्यातच पावसाळ्याचे दिवस असल्याने खड्ड्यांमध्ये पाणी साचून रस्त्यावरील खड्यात चिखलाचे दलदल होत आहे या रस्त्यावरून प्रवास करताना विद्यार्थी शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. बारगाव नांदूर ते डिग्रस या रस्त्याची वाळू वाहतुकीच्या साधनांमुळे मोठी दुरावस्था झाली आहे दळणवळणच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा रस्ता या रस्त्यावरून अनेक शेतकरी शालेय विद्यार्थी प्रवास करत आहेत. या पावसाच्या पाण्याने मोठ मोठी खड्डे पडली आहेत. त्यामुळे प्रवास करणाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
गेल्या दहा ते पंधरा दिवसांपूर्वी राहुरी खुर्द हद्दीत नगरच्या गौण खनिज पथकाने छापा टाकत कारवाई केली होती त्या कारवाई मध्ये 94 ते 95 ब्रॉस वाळू चा पंचनामा करण्यात आला होता मात्र पंचनामा झाल्यानंतर काही तासातच पंचनामा केलेली वाळू अचानक गायब झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे अचानक गायब झालेल्या वाळू तस्करी ला भय कुणाचे असा प्रश्न निर्माण होत आहे तर दुसरीकडे महसूल विभाग व पोलीस प्रशासन कारवाईचा बडगा का उगारत नाही अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकरी व परिसरातील नागरिकाकडून व्यक्त केल्या जात आहेत.. या वाळू तस्करीचा राहुरी महसूल विभाग व पोलीस प्रशासनाने तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातून जोरदार लागली आहे.
बारागाव नांदूर सह डिग्रस. राहुरी खुर्द हद्दीतून चोरटी वाळू वाहतूक सुरू असल्याबाबत तहसीलदार पोलीस प्रशासन व मंडल अधिकारी व तलाठी यांना याविषयी वेळोवेळी या बाबद महिती देऊन देखील त्यांनी याकडे जाणून दुर्लक्ष केले आहे की काय ? हा संतप्त सवाल सर्वसामान्य जनतेतून विचारला जात आहे.