गुन्हेगारी

गल्लीतील सार्वजनिक रस्त्यावरील सर्व अतिक्रमणे काढण्याच्या मागणीसाठी अमरण उपोषण 

कुंभार गल्लीतील सार्वजनिक रस्त्यावरील सर्व अतिक्रमणे काढण्याच्या मागणीसाठी अमरण उपोषण 

 

कर्जत प्रतिनिधी – कर्जत शहरातील कुंभार गल्लीतील सार्वजनिक रस्त्यावरील सर्व अतिक्रमण काढून पूर्ण रस्ता खुला करण्यात यावा तसेच रस्त्यावरील सर्व अतिक्रमण काढल्याशिवाय रस्त्याचे कॉंक्रिटीकरणाचे काम करण्यात येऊ नये. अशी मागणी क्षीरसागर कुटुंबा कडुन करण्यात आली . अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल असे निवेदन तक्रारदार विश्वनाथ मारुती क्षीरसागर, बाळासाहेब मारुती क्षीरसागर, अमोल बाळासाहेब क्षीरसागर आणि अजिंक्य बाळासाहेब क्षीरसागर यांनी कर्जत नगरपंचायत चे मुख्याधिकारी व कर्जत नगरपंचायत च्या नगराध्यक्षा यांना लेखी निवेदन दिले होते. परंतु नगरपंचायतने पूर्ण रस्त्यावरील अतिक्रमणे न काढताच रस्ता करण्यास सुरुवात केली होती. तक्रारदाराचे म्हणणे होते की संपूर्ण रस्त्यावरील सर्व अतिक्रमण अगोदर काढून घ्यावे व  नंतर नवीन रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात यावे. अशी  मागणी तक्रारदारांची होती. परंतु संपूर्ण रस्त्यावरील अतिक्रमण न काढताच कर्जत नगरपंचायतने रस्त्याच्या कॉंक्रिटीकरण कामास सुरुवात केल्याने क्षीरसागर कुटुंबीयांनी या कामास हरकत घेत आज दिनांक २ ऑक्टोबर रोजी पासून कर्जत नगरपंचायतच्या आवारात आमरण उपोषण करण्यास सुरुवात केलेली आहे. तक्रारदार अमोल क्षीरसागर यांचे म्हणणे आहे की सिटी सर्वे नंबर ८१९  मध्ये आमचे राहत्या घराचे बांधकाम आहे. आणि बांधकामाचा लोखंडी जिना व ओटा हे अतिक्रमात आहे. असे गृहीत धरून नगरपंचायतने दिनांक ९ जुलै रोजी  हे अतिक्रमण काढून टाकले आहे. परंतु सदर रस्त्यावरील नमूद केलेले इतर अतिक्रमण नगरपंचायतने काढलेले नाही. सर्वांना समान न्याय या बाबीवर नगरपंचायतने ठाम राहून सर्वांना समान न्याय द्यावा व जसे आमचे अतिक्रमण काढले तसे इतरांचे अतिक्रमण काढून टाकावे अशी मागणी तक्रारदार अमोल क्षीरसागर यांनी केलेली होती. तसेच जसे आमचे अतिक्रमण काढले तसेच त्यापुढील रस्त्याच्या पूर्व बाजूचे व उत्तर दक्षिण रस्त्यावरील दक्षिण बाजूचे सार्वजनिक रस्त्यावरील सर्व अतिक्रमण त्वरित काढून रस्त्यावरील अडथळा दूर करावा आणि त्यानंतर रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे कामे व इतर कामे सुरू करावीत अशी मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली होती. परंतु ही मागणी पूर्ण न झाल्यामुळे आज पासून  क्षीरसागर कुटुंबीय सहपरिवार  नगरपंचायत कार्यालया समोर उपोषणास बसलेले आहेत. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी अहमदनगर, तहसील कार्यालय कर्जत, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन कर्जत, प्रांत अधिकारी कर्जत, तसेच पोलीस अधीक्षक अहमदनगर यांना या निवेदनाच्या प्रती देण्यात आलेल्या आहेत.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे