कर्जत शहरात साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठेंची जयंती ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी

कर्जत शहरात साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठेंची जयंती ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी
दादा पाटील महाविद्यालया जवळील रस्त्यास साठेचौक असे नामकरण
कर्जत प्रतिनिधी – जगविख्यात साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची १०२ वी जयंती कर्जतमध्ये ठिकठिकाणी साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज चौकातील साठेंच्या प्रतिमेची पुजा कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या हस्ते करण्यात आली .
यावेळी नगराध्यक्षा उषा राऊत, माजी उपनगराध्यक्षा प्रतिभाताई भैलुमे कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले, नगरपंचायतचे गटनेते संतोष मेहेत्रे, मृत्युंजय ग्रुपचे अध्यक्ष दिपक शहाणे, युवक नेते सचिन घुले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील शेलार, प्रा विक्रम कांबळे, संजय भिसे, सतिष पवार यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. दादा पाटील महाविद्यालया शेजारील चौकाचे साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे नामकरण कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले यांच्या हस्ते फलकाचे अनावरण करण्यात आले.
या कार्यक्रमास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल, नगरसेविका ताराबाई कुलथे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, मातंग एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब लोंढे, बहुजन रयत परिषदेचे सतीश पवार, मातंग एकता आंदोलनाचे तालुकाध्यक्ष विजय शिंदे, प्रभाकर पवार , संतोष ढावरे, कल्याण जगधने, विनोद पवार, रुद्र भिसे, काका खुडे, रोहित पवार, देविदास उकिरडे, संभाजी लोंढे, समाधान डाडर, यशवंत गायकवाड, दिगंबर पवार, महेंद्र जगधने, आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांची अण्णाभाऊंच्या जीवन चरित्रावर भाषणे झाली. दरम्यान कार्यकर्त्यांनी महापुरुषांच्या गगनभेदी घोषणा देऊन कर्जत शहर दणाणून सोडले होते . पिवळे झेंडे , सजवलेला भव्य मंच, आणि ओसंडून वाहणाऱ्या उत्साहात अण्णाभाऊ जयंती साजरी करण्यात आली. कर्जत मधे साठेनगर, राजीव गांधींनगर येथेही अण्णाभाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
नगरपंचायतीच्या मासिक बैठकीत दादा पाटील महाविद्यालया जवळील चौकास साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे नावाचा ठराव मंजूर करून अण्णाभाऊंचा सन्मान करून हा चौक अधिकृत केला जाईल अशी ग्वाही नगराध्यक्षा उषा राऊत व काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले यांनी यावेळी आश्वासन दिले .