गुन्हेगारी

बालविवाह करून पीडित अल्पवयीन मुलीस गरोदर करून नवजात बालकास जन्म दिल्याने नराधमास राहुरी पोलिसांकडून अटक

 

 

बालविवाह करून पीडित अल्पवयीन मुलीस गरोदर करून नवजात बालकास जन्म दिल्याने नराधमास राहुरी पोलिसांकडून अटक

राहुरी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 1195/2024 भादवि कलम 376(2)(n),(j) सह पोक्सो अधिनियम कलम 4 5 6 10 11 सह बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 चे कलम 11 प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी व त्याचे आई-वडील व सासू-सासरे यांनी सदर गुन्ह्यातील फिर्यादी पीडित अल्पवयीन मुलीचे आरोपीशी लग्न लावून दिले तसेच सदर आरोपीने अल्पवयीन पीडित मुलगी फिर्यादी हिच्याशी जबरीने शारीरिक संबंध ठेवून तिला गरोदर ठेवले व नवजात बालकास जन्म दिल्याने सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याच्या तपासात मुख्य आरोपी यास राहुरी पोलिसांनी दिनांक 30.12.2024 रोजी अटक केली असून त्यास माननीय न्यायालयाने 01/01/2025 रोजी पर्यन्त पोलीस कोठडी रिमांड सुनावली आहे.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे हे करत आहेत.

*सर्व नागरिकांना याद्वारे आव्हान करण्यात येते की कोणीही आपल्या मुला अथवा मुलीचे लग्नाचे वय पूर्ण झाल्याशिवाय त्यांचा विवाह करू नये. अन्यथा त्यांच्यावर व लग्न जुळणारे आई-वडील सासू-सासरे यांच्यावर गुन्हा दाखल होतो. सर्व ग्रामपंचायत, पोलीस पाटील, ग्रामसेवक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून आपापल्या क्षेत्रामध्ये जनजागृती करावी असे आवाहन करण्यात येत आहे.*

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक  राकेश ओला  अप्पर पोलीस अधीक्षक  वैभव कलुबर्मे , उपविभागीय पोलिस अधिकारी  बसवराज शिवपुजे,  यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात तपासपथकाचे पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे ,पोलीस हवालदार सुरज गायकवाड, राहुल यादव, प्रमोद ढाकणे , सतिष कुऱ्हाडे,धायगुडे ,गोवर्धन कदम, अंकुश भोसले, इफ्तेखर सय्यद, सचिन ताजने यांच्या पथकाने केलेली आहे.

Rate this post
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे