9 लाख 84 हजार रुपयांच्या गोमासासह गाडी जप्त श्रीरामपूर पोलिसांची कामगिरी

9 लाख 84 हजार रुपयांच्या गोमासासह गाडी जप्त श्रीरामपूर पोलिसांची कामगिरी
श्रीरामपूर शहर पोलिसांची गोमासावर सर्वात मोठी कारवाई झाल्याने पोलिसांचे सर्वांकडून अभिनंदन होत आहे पोलीस अधीक्षकांनी अवैध धंद्यावर उगारलेल्या बडग्याचा हा एक भाग म्हणता येईल. जिल्ह्यामध्ये अवैद्य धंद्याने वर डोके काढण्याची ही परिस्थिती आटोक्यात आणून अवैध धंद्यांचे उच्चाटन करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच पोलिसांनी दंड थोपटल्याचे चित्र दिसत आहे. याचाच एक भाग श्रीरामपूर शहर पोलिसांची गोमासावर सर्वात मोठी कारवाई दिनांक २३ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी पोलीस निरीक्षक देशमुख यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की कुरेशी मोहल्ला वार्ड नंबर दोन श्रीरामपूर येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करत आहे व कत्तल केलेले गोमास गाडीमध्ये भरत आहेत. गोमास विक्रीसाठी घेऊन जाणार आहे आत्ता गेल्यास मिळून येईल. अशी बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक देशमुख यांनी पोलीस पथकास वरील ठिकाणी जाऊन कारवाई करण्याचे आदेश दिल्याने सदर पथक, पंच व पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यासह पोहोचले असता दोन इसम गोवंशय जनावरांचे कत्तल केलेले मासाचे तुकडे एका होंडा सिटी कार मध्ये भरताना दिसले.
पोलिसांनी त्यांना जागीच पकडून नाव व पत्ता विचारल्याने त्यांनी त्यांची नावे (1) नियाज फकीरचंद शेख वय 46 (2) जावेद मुस्ताक कुरेशी वय 24 वॉर्ड नंबर 2 श्रीरामपूर असल्याचे सांगितले पंच व पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या समक्ष शेड व गाडीची झडती घेतली असता 6 लाख 86 हजार रुपये किमतीचे तीन 3630 किलो गोमास व तीन लाख रुपये किमतीची एक होंडा सिटी कार पांढऱ्या रंगाची कार नंबर MH 01 AE 8627 जप्त करून आरोपी विरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 1189/ 24 नुसार सुधारित कलम कायदा 5,5( अ ब क) 9 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला ,अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबरमे, डीवायएसपी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके, पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, पोना शरद अहिरे, पो कॉ, संभाजी खरात, अजित पठारे, अमोल पडोळे, धनंजय वाघमारे, अमोल गायकवाड, अजिनाथ आंधळे, रवींद्र शिंदे अकबर पठाण, रामेश्वर तारडे यांनी केली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम हे करीत आहे.
तालुक्यातील पोलीस यंत्रणेने कडक नजर ठेवून अवैध सर्व धंदे राजरोज चालतात याकडे देखील यंत्रणेने लक्ष घालून अवैध धंदे बंद करून कडक कारवाई करावी. जेणेकरून परत या धंद्याकडे डोळे वर करून बघण्याची हिंमत कोणी करणार नाही अशी ग्रामस्थांची मागणी होत आहे. केलेल्या गोमास कारवाई बद्दल सर्व नागरिकांमधून पोलिसांचे अभिनंदन होत आहे.