धार्मिक
बाठीया यांच्याकडून दोन मंदिरास ५२ हजार रुपये देणगी

बाठीया यांच्याकडून दोन मंदिरास ५२ हजार रुपये देणगी
येथील प्रतिथयश व्यापारी राजकुमार बाठीया यांनी गावातील दोन मंदिराच्या बांधकामासाठी “५२ हजार रुपयांचे देणगी दिली आहे येथील प्रतिथयश व्यापारी राजकुमार मिलनकुमार बाठीया यांनी बाजारवेस हनुमान मंदिर जिर्णोद्धार कामासाठी रुपये २१ हजार तसेच बेलापुरचे ग्रामदैवत भगवान श्री हरिहर केशव गोविंद मदिरांच्या कामासाठी रुपये ३१ हजार असे एकुण ५२ हजार रुपयांची देणगी राजेश खटोड यांच्याकडे सुपूर्त केली या वेळी सामाजिक कार्यकर्ते सुवालाल लुक्कड ,विजया कटारीया ,बाळासाहेब दायमा , पत्रकार दिलीप दायमा, राहुल दायमा उपस्थित होते.