टाकळीभान येथील साईबाबा मंदिरची दानपेटी चोरट्यांनी फोडली… भोकर मध्ये एका शेतकऱ्याच्या पाच शेळ्या व एकाची टू व्हीलर ची चोरी…

टाकळीभान येथील साईबाबा मंदिरची दानपेटी चोरट्यांनी फोडली…
भोकर मध्ये एका शेतकऱ्याच्या पाच शेळ्या व एकाची टू व्हीलर ची चोरी…
टाकळीभान: टाकळीभान येथील वाडगाव रोडचे श्री साईबाबा मंदिर येथे अज्ञात चोरट्यांनी रविवार दि. 2 जुलै रोजी मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या दरम्यान वेल्डिंग साहित्याने दानपेटी फोडून दानपेटीतील पंधरा-वीस हजाराचा ऐवज चोरून नेला, त्यानंतर चोरट्यांनी टाकळीभान श्रीरामपूर रोडवरील पूलाच्या डॅमच्या पुढे असणाऱ्या बनकर वस्ती येथे रात्री 1.30 च्या सुमारास लहान भाऊ बनकर यांची टीव्हीएस कंपनीची टू व्हीलरची गाडी चोरली, नंतर 2 च्या सुमारास भोकर शिवारात चोरट्यांनी आपला मोर्चा वळून शेतकरी अनिल सखाराम दिवटे यांच्या चार शेळ्या व एक बोकड चोरून नेले. टाकळीभान व परिसरात कायम चोरट्यांचा सुळसुळाट सुरू असून नागरिक चोऱ्याना धास्तावले आहेत.
टाकळीभान साई बाबा मंदिराची आत्तापर्यंत तब्बल तीन वेळेस चोरी झाली असून दिवसेंदिवस चोऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहेत. तरी पोलीस यंत्रणेने रोज रात्री काळजीपूर्वक गस्त करावी चोऱ्यांना आळा घालावा अशी मागणी टाकळीभान व परिसरातील नागरिकांमधून होत आहे. घटनास्थळी पोलीस उप निरीक्षक अतुल बोरसे साहेब व पोलीस यंत्रणेने सदर घटनेची पाहणी करून पंचनामा केला.