तालुक्यात ९ नविन स्वस्त धान्य दुकानाचे देण्यात येणार

तालुक्यात ९ नविन स्वस्त धान्य दुकानाचे देण्यात येणार
श्रीरामपुर शहर व तालुक्यासह १४ तालुके व अहमदनगर शहर असे एकुण १६४ नविन स्वस्त धान्य दुकानाचे जाहीरनामे काढण्यात आले असुन दुकान घेणाऱ्यांनी दिनांक ३१ जुलैपर्यत संबधीत तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेत अर्ज करावा असे अवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांनी केले आहे अहमदनगर जिल्ह्यातील १४ तालुक्यात नविन स्वस्त धान्य दुकाने मंजुर करण्यात येणार असुन ग्रामिण भागात १४७ तसेच अहमदनगर शहरात १७ नविन स्वस्त धान्य दुकान सुरु करण्यात येणार आहे श्रीरामपुर तालुक्यातील वांगी , रामपुर तसेच कडीत बु!! या गावाकरीता नविन स्वस्त धान्य दुकान मंजुर करण्यात येणार आहे तसेच श्रीरामपुर शहरात रद्द झालेले एस के गुप्ता ,एस एस डोळस ,सर्व्हंट को आँप सोसायटी ,प्रगत प्राथमिक ,अहमदनगर जिल्हा सेवक युनियन ,मातापुर बिग बागायतदार सोसायटी असे सहा व ग्रामिण भागातील तीनअसे एकुण ९ नविन स्वस्त धान्य दुकान मंजुर करण्यात येणार आहे नविन स्वस्त धान्य दुकान घेवु इच्छिणाऱ्या महीला बचत गट पुरुष बचत गट विविध संस्था व्यक्ती यांनी संबधीत तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेशी संपर्क साधावा या बाबतची सविस्तर माहीती अहमदनगरच्या अधिकृत संकेत स्थळावरही( wwwahmednagar.nic.in) उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे