शनि शिंगणापूर ग्रामपंचायत पथकर नाक्यावरील कर्मचाऱ्यास मारहाण करुन रोख रक्कम लंपास केली..

शनि शिंगणापूर ग्रामपंचायत पथकर नाक्यावरील कर्मचाऱ्यास मारहाण करुन रोख रक्कम लंपास केली..
शनिशिंगणापूर — शनि शिंगणापूर येथे दि. ३ जुलै रोजी रात्री ९.४५ च्या दरम्यान ग्रामपंचायत पथकर नाका नंबर २ वरील कर्मचारी दत्तात्रय नामदेव खामकर वय ४२ हे नाक्यावरील जमा झालेली दिवसभरातील रोख रकमेची जुळवा जुळव करत असताना त्या ठिकाणी काळ्या रंगाच्या पल्सर मोटार सायकल वरती महेश सोनवणे, ऋतीक सोनवणे, महेश शिंदे सर्व राहणार पानसवाडी हे तिघे फिर्यादी जवळ येऊन पैशाची मागणी करु लागले. त्यास फिर्यादी ने नकार दिला असता त्यांनी त्यांच्या जवळील लोखंडी गजाने मारहाण करत फिर्यादी जवळील जमा झालेले पाच ते सहा हजार रोख रक्कम हिसकावून घेत सोनई च्या दिशेने पोबारा केला. खामकर यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन शनि शिंगणापूर पोलीस ठाण्यात गु. र. नं. १३९/२०२३ भा. द. वी कलम ३२७,३२४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एन. पि. सप्तर्षी हे करत आहेत.