धार्मिक

साई बाबा की जय” जयघोषाने गेवराई शहर दणाणले 

गेवराईत साईंच्या पालखीचे जोरदार स्वागत

 

“साई बाबा की जय” जयघोषाने गेवराई शहर दणाणले 

 

अंबासाखर कारखाना ते शिर्डी या साई भक्तांची पायी पालखी सोहळा साईबाबांच्या नामाचा जयघोष करत शिर्डीकडे रवाना होत असून गेवराई शहरातील जायकवाडी वसाहत येथील रूद्रेश्वर मंदिर या ठिकाणी पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी साईंच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी करत साईबाबांच्या नामाचा जयघोष केला. 

 

अंबासाखर कारखाना येथील साई पालखी मराठवाड्यातील मानाची पाहिली पालखी म्हणून ओळखली जाते. गेली सत्तावीस वर्षापासुन पालखी सोहळा साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जात असून २२ जानेवारी रोजी हा साई पायी पालखी सोहळा शिर्डीकडे मार्गस्थ होत असतो. प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी गुरुवार दि.२६ जानेवारी रोजी सायंकाळी हा सोहळा शेकडो साई भक्तांसह गेवराई शहरात दाखल झाला होता. शहरातील मुख्य रस्त्याने साई नामाच्या जय घोषात ढोल ताश्याच्या गजरात वाजत गाजत अतिषबाजी करत गेवराईच्या साईभक्तांनी मिरवणूक काढून साईंच्या पालखीचे जल्लोषात स्वागत केले. शहरातील मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी रांगोळी काढूण फटाक्याची अतीषबाजीही करण्यात आली. पालखी सोहळा वाजत गाजत रूद्रेश्वर मंदिर जायकवाडी वसाहात मुक्कामी पेाहचला. मंदिर परिसरात साई भक्तांच्या वतीने साई भजन संध्या तसेच गेवराई साई भक्त परिवार यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शहरवासीयांनी दर्शनासह महाप्रसादाचा लाभ घेतला. पालखी सोहळ्यात शेकडो साईभक्त सहभागी झाले असून पहाटे काकडा आरती, श्री पादुका व पालखी पुजन, मंगलस्नान, महाअभिषक करुण शेकडो साई भक्तांसह पालखी सोहळा शिर्डीच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे