महाराष्ट्र

यशवंत प्रतिष्ठान ग्रामविकासाचे रोल मॉडेल.पदमश्री पोपटराव पवार*.

*यशवंत प्रतिष्ठान ग्रामविकासाचे रोल मॉडेल.पदमश्री पोपटराव पवार*.

 

यशवंत प्रतिष्ठानचे कृतज्ञता पुरस्कार

पदमश्री पोपटराव पवार,हणमंतराव गायकवाड,कमलताई परदेशी यांना प्रदान.

सोनई प्रतिनिधी राहुल राजळे.

यशवंत सामाजिक प्रतिष्ठान सोनईच्या वतीने पदमश्री पोपटराव पवार,उद्योजक हणमंतराव गायकवाड, कमलताई परदेशी यांना रवी दि 29 जाने 2023 रोजी कृतज्ञता पुरस्काराने मा खा यशवंतराव गडाख यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.

तरुणाई समाजासाठी हे ब्रीद घेऊन विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी सन्मान करण्यात येतो.

उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्रतिष्ठानचे मार्गदर्शक आ शंकरराव गडाख यांनी केले.यशवंत प्रतिष्ठान राबवत असलेल्या विविध उपक्रमांची त्यांनी माहिती दिली.

कृतज्ञत भावनेने हा पुरस्कार दिला जातो ही भूमिका विशद केली व उपस्थितांचे आभार मानले.

याप्रसंगी बोलतांना पदमश्री पोपटराव पवार म्हणाले ग्रामविकासासाठी ग्रामीण भागात राहून दत्तकग्राम,मरणोत्तर नेत्रदान,गाव तिथे वाचनालय,मुलींचे दत्तक पालकत्व यांसारखे सामाजउपयोगी उपक्रम राबवून यशवंत सामाजिक प्रतिष्ठानने एक दिशादर्शक काम मा खा यशवंतराव गडाख यांच्या प्रेरणेने आ शंकरराव गडाख व यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे व ते आजही सुरू आहे.

यशवंत प्रतिष्ठान सारख्या सामाजिक संस्थामुळे गावांचा कायापालट होतो आहे.भविष्यात गावे हीच विकासाची केंद्रे निर्माण होणार आहेत.प्रतिष्ठानचे काम रोल मॉडेल सारखे असल्याने प्रतिपादन पदमश्री पोपटराव पवार यांनी केले.

ज्या तालुक्यात मी शेतमजूर महिला म्हणून काम केले त्याच नेवासा तालुक्याच्या भूमीत मला पुरस्कार मिळतोय ही बाब माझ्यासाठी अभिमानास्पद अशीच आहे.यशवंत प्रतिष्ठानने माझ्या केलेल्या सन्मानामुळे बचतगट चळवळीत काम करणाऱ्या महिला भगिनींना प्रेरणा मिळणार आहे.

300 रुपयांपासून सुरू केलेला मसाला व्यवसाय आज कोट्यवधी रुपयापर्यत फक्त नीतिमत्ता व चिकाटी याबळावर पोहचला असल्याचा त्या म्हणाल्या.

अ कृषी क्षेत्रात काम करत असताना ज्या समाजात आपण लहानचे मोठे झालो त्या समाजासाठी आपण काही तरी केले पाहिजे या हेतूने शेती क्षेत्रात बी व्ही जी ग्रुपने काम करण्यास सुरुवात केली आहे.

परंतु आज सोनईला भेट दिली तर मनाला समाधान वाटले गडाख कुटुंबाने सामाजिक वसा घेऊन जे काम उभे केले आहे ते आमच्या सारख्याना निश्चितच प्रेरणादायी असेच आहे.

आपल्या पेक्षा कोणी तरी मोठे काम ग्रामीण भागातील नागरिकांसाठी करते आहे ही भावना यशवंत प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात मनाला मोठा आनंद देऊन गेली.

प्रतिष्ठानच्या पुरस्काराने जबादारी वाढली असल्याचे हणमंतराव गायकवाड म्हणाले.

याप्रसंगी आ शंकरराव गडाख,वात्रटटिकाकार रामदास फुटाणे,साहित्यिक अरुण शेवते,आ आशुतोष काळे ,मीनाताई जगधने,आ मोनिकाताई राजळे,माजी आ चंद्रशेखर घुले,सचिन इटकर,शारदाताई गडाख ,विश्वासराव गडाख,विजय गडाख,यशवंत प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष उदयन गडाख,मा सभापती सुनीलराव गडाख,मा सभापती सौ सुनीताताई गडाख,मा जी प अध्यक्ष,राजश्रीताई घुले ,मा आ पांडुरंग अभंग,कु नेहल प्रशांत गडाख,डॉ निवेदिता गडाख,संपतराव म्हस्के,काशिनाथ लवांडे, उद्धव वाघ,सचिन गुजर,संपादक,पत्रकार आदींसह नेवासा तालुक्यासह नगर जिल्ह्यातुन मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते.

अरुण शेवते लिखित मनातला पाऊस पुस्तके देऊन प्रतिष्ठानच्या वतीने पुरस्कार्थींचे स्वागत करण्यात आले.

सुत्रसंचालन डॉ सुभाष देवढे पाटील यांनी केले.

वैष्णवी घाटोळे हिने सादर केलेल्या पसायदानने कार्यक्रमाची सांगता झाली.

 

पदमश्री पोपटराव पवार,हणमंतराव गायकवाड,कमलताई परदेशी यांना कृतज्ञता पुरस्कार प्रदान करतांना मा खा यशवंतराव गडाख,याप्रसंगी उपस्थित आ शंकरराव गडाख,डॉ सुभाष देवढे आदी

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे