पांढरं सोनं चोरीचा प्रयत्न अयशस्वी.दुकान फोडल्यावर समजले…..

पांढरं सोनं चोरीचा प्रयत्न अयशस्वी ठरला
भेर्डापुर येथे कापूस चोरीसाठी केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला आहे.सद्ध्या कापसाच्या भाववाढ दरात काही प्रमाणात घसरण झालेली दिसतेय.
त्यात कापुस चोरांचा सुळसुळाट झाला आहे.भेर्डापुर येथील अजित किसन गायकवाड हे भेर्डापूर गावात उद्योग , व्यावसायिकांसाठी दुकान गाळे भाडोत्री देतात.
शरद दत्तात्रय दांगट यांनी अजित गायकवाड यांच्याकडून कापूस खरेदी-विक्री साठी गाळा भाडोत्री घेतला आहे.
शरद दांगट यांचा कापूस खरेदी-विक्रीचा व्यापार उत्तम प्रकारे चालतोय.मग त्या गाळ्यात कापूस असावा, या उद्देशाने रात्रीच्या वेळी चोरांनी कापूस गाळा दुकानचे शेटरचे कुलुप तोडले आहेत.
शरद दांगट हे दिवसभर कापूस खरेदी करत असतात . कापूस मिळेल या अंदाजाने चोरांनी कापूस गाळा दुकानाचे शेटरचे कुलूप तोडून उपयोग झाला नाही .शरद दांगट हे दिवसभरात खरेदी केलेल्या कापसाची संध्याकाळ पर्यंत विक्री करतात. त्यामुळे कापूस शिल्लक राहत नाही.
परिणामी चोरांचा चोरीचा प्रयत्न्याचा रचलेला कट अयशस्वी ठरला आहे.