जिल्हा साथरोग अधिकारी डाॅ. मोहन शिंदे यांच्याकडून कर्मचार्यांची झाडाझडती.

जिल्हा साथरोग अधिकारी डाॅ. मोहन शिंदे यांच्याकडून कर्मचार्यांची झाडाझडती.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सर्व कर्मचार्यांनी मुख्यालयात राहवे, ज्या कर्मचार्याची नियुक्ती ज्यापदी झालेली आहे तेच काम करावे इतर कामे करू नये, सफाई कर्मचार्यांनी आरोग्य केंद्र व परिसर स्वच्छ ठेवावा व पुन्हा आरोग्य केंद्राची तक्रार येवू देवू नये.
तक्रार आल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा साथरोग अधिकारी डाॅ. मोहन शिंदे यांनी दिला व कर्मचार्यांची चांगलीच झाडाझडती घेतली.
टाकळीभान ग्रामस्थ सविधान ग्रुप यानी जिल्हापरिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना टाकळीभान गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरावस्था, केंद्रात अस्वच्छता व कर्मचार्याच्या हलगर्जी पणाबाबत अर्ज दिला होता.
त्या अर्जाची दखल घेत आज दिनांक ९ रोजी डाॅ. मोहन शिंदे यांनी आरोग्य केंद्राला भेट देवून ग्रामस्थ व कर्मचारी यांची बैठक घेवून ग्रामस्थांनी दिलेल्या अर्जावरून कर्मचार्यांची चांगलीच कानउघडणी केली.
ग्रामस्थांनी अर्जात आमचे गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अवस्था सद्यस्थितीत अतिशय बिकट झालेली आहे. या ठिकाणी अतिशय जास्त प्रमाणात अस्वच्छता पसरलेली आहे. वीज पुरवठा बंद झाल्यावर केंद्रात अंधाराचे साम्राज्य असते त्यामुळे अंतररुग्णांना रात्रीचे वेळी अक्षरश: रुग्णांना मेणबत्ती लावून बसावे लागते. केंद्रात व परिसरात अस्वच्छता असल्याने येथे डासांचे साम्राज्य असल्याने रुग्ण बरे होण्याऐवजी आजारी पडत आहेत. या बाबतीत अनेकदा येथील वैद्यकिय अधिकारी व कर्मचार्यांना सूचना देऊन सुद्धा याकडे सर्वजण कानाडोळा करतात. उडवा उडवीचे उत्तर देतात तरी याबाबत आपण व्यक्तिगत लक्ष घालून सर्वसामान्य नागरिकांना होणान्या त्रासातून मुक्त करावे असे अर्जात नमुद केले होते.
यावेळी वैद्यकिय अधिकारी डाॅ. राम बोरूडे, सर्व कर्मचारी, उपसरपच कान्हा खंडागळे, मेजर विनोद रणनवरे, आर पीआयचे आबासाहेब रणनवरे, मोहन रणनवरे, गणेश गायकवाड, सुंदर रणनवरे आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
येथील आरोग्य केंद्राला जिल्हा साथरोग अधिकारी डाॅ. मोहन शिंदे यांनी भेट दिली व ग्रामस्थ व कर्मचारी यांची बैठक घेवून कर्मचार्यांची चांगलीच कानउघडणी केली. यावेळी वेद्यकीय अधिकारी डाॅ. राम बोरूडे, कर्मचारी, उपसरपंच कान्हा खंडागळे, विनोद रणनवरे, आबासाहेब रणनवरे आदी.