श्री. गजानन महाराज शुगर लिमिटेड युटेक कारखान्याच्या वतीने सभासदांना दिवाळी निमित्त साखर वाटप.

श्री. गजानन महाराज शुगर लिमिटेड युटेक कारखान्याच्या वतीने सभासदांना दिवाळी निमित्त साखर वाटप.
श्री. गजानन महाराज शुगर लिमिटेड युटेक साखर कारखान्याच्या वतीने दिवाळी निमित्त टाकळीभान येथील कारखाना सभासदांना मोफत १० किलो साखर वाटप करण्यात आली.
टाकळीभान येथील कारखाना कार्यालयात कारखान्याचे संचालक केरूबापू मगर पाटील यांच्या हस्ते सभासदांना साखर वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी बोलतांना केरूबापू मगर म्हणाले की,
दरवर्षी कारखान्या मार्फत दिवाळी निमित्त दिवाळीच्या आधी सभासदांना मोफत १० किलो साखर वाटप केली जाते मात्र यावर्षी पाऊस असल्याने साखर वाटप उशीरा करण्यात येत असून
त्याबद्दल कारखान्याच्या वतीने त्यांनी दिलगिरी व्यक्त करून सर्व सभासदांनी साखर घेवून जावी
असे आवाहन केले.
यावेळी अॅड. धनराज कोकणे, राजेंद्र माने,
अशोक कोकणे, रामकृष्ण गायकवाड, सुरेश मगर,
सुनिल मगर, दिपक जगताप, दिनकर खवले तसेच
कारखान्याचे कर्मचारी गंगाधर पटारे, शिवाजी शेळके, लोकेश चव्हाण उपस्थित होते.
येथे श्री. गजानन महाराज शुगर लिमिटेड यांचे वतीने कारखाना सभासदांना दिवाळी निमित्त मोफत १० किलो साखर वाटप करण्यात आली. संचालक केरूबापू मगर, गंगाधर पटारे, धनराज कोकणे, राजेंद्र माने आदी उपस्थित होते.