धक्कादायक- बंधाऱ्यावर खड्ड्यात गाडी आदळून तोल जाऊन, पाण्यात पडून दुर्देवी मृत्यू.

धक्कादायक- बंधाऱ्यावर खड्ड्यात गाडी आदळून तोल जाऊन, पाण्यात पडून दुर्देवी मृत्यू.
अतिवृष्टी पावसामुळे शेतीचे सोयाबीन काढणीचे कटकटीचे कामे आटोपल्यावर गोदाकाठ पलीकडे कमालपूर बंधाऱ्यावरून मोटारसायकल वरून आपल्या पतीबरोबर माहेरी भाऊबीजेस देवगांव शनी येथे जतांना बंधाऱ्यावर खड्ड्यात गाडी आदळून तोल जाऊन नारायण दगडू मुठे (वय ६५) यांचा बंधाऱ्यावरून नदीत पाण्यात पडून दुर्देवी मृत्यू झाला तर पत्नी शकुंतला मुठे बालंबाल बचावल्याची घटना आज मंगळवार दि. १ नोव्हे.सायंकाळच्या सुमारास कमालपूर हद्दीत साडेपाचच्या सुमारास घडली.
सायंकाळी पाचच्या सुमारास नारायण मूठे हे आपल्या पत्नी समवेत मोटारसायकल वरून भाऊबीज ( करगुटे ) घेऊन मुठेवाडगांव येथून वैजापूर तालुक्यातील देवगाव शनी ( माहेरी) गांवी जाण्यासाठी कमालपूर मार्गे निघाले. गोदावरी नदीवर कमालपूर बंधारा ओलांडत असताना शे पन्नास फुटावरच खड्डयावर गाडी आदळून तोल जाऊन ख नारायण मुठे पुलाखाली नदीच्या पाण्यात कोसळले . पत्नी सौ.शकुंतला मुठे या रस्त्यावर पडल्याने बालंबाल बचावल्या क्षणार्थात घडलेल्या या घटनेच्या एकमेव साक्षीदार पत्नीच आहे. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर मच्छीमार मदतीला धावले.पाण्यातुन मुठे यांना शोधून काढण्यास वीस मिनिटे लागली. तोपर्यंत नियतीने आपला कार्यभाग आटोपलेला होता. शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह श्रीरामपूर येथे आणण्यात आला. पोलीस पुढील तपास करत आहेत.