महाराष्ट्र
टाकळीभान येथे महाशिवराञी उत्साहात साजरी.

टाकळीभान येथे महाशिवराञी उत्साहात साजरी.
टाकळीभान पंचक्रोशिचे ग्रामदैवत आसलेल्या येथील शंभो महादेवाच्या मंदिरात शिवराञी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनामुळे गेली दोन वर्षे मंदिरे बंद होती माञ कोरोनाचा कहर कमी झाल्याने शंभु महादेवाच्या दर्शनाला आसुसलेल्या भाविक भक्तांनी भल्या पहाटपासुनच शंभु महादेवाच्या दर्शनाचा लाभ घेतला.
शिवराञी निमित्त महादेव याञा कमेटीने सुयोग्य नियोजन केले होते. भल्या पहाटे गंगा जलाने स्नान घालुन आभिषेक करण्यात आला. सुदाम देवळालकर यांनी यावेळी पौराहित्य केले. कान्हा खंडागळे मिञमंडळाच्या वतीने खिचडी प्रसाद तर पत्रकार दिलीप लोखंडे मित्र मंडळाच्या वतीने केळीचे वाटप करण्यात आले . पुरातन हेंबाडपंथी भव्य मंदिराची डागडुजी व रंगरंगोटीचे काम यंदा याञा कमेटीने हाती घेतले आसुन ग्रामस्थ व भाविक भक्तांच्या देणगीतुन हे काम पुर्णत्वास जात आहे. या कामासाठी ग्रामस्थांनी व भाविक भक्तांनी मदतीचा हात पुढे करावा आसे आवाहन याञा कमेटीच्या वतीने वेळोवेळी केले जात होते. ग्रामस्थ व भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला.