गेवराईत गौरी पुजनाच्या दिवशी बेटी बचाओ बेटी पढाओ देखावा सादर

गेवराईत गौरी पुजनाच्या दिवशी बेटी बचाओ बेटी पढाओ देखावा सादर
सौ पल्लवी गोगुले यांचा आदर्श उपक्रम
गौरी गणपतीच्या सणाचे औचित्य साधून दरवर्षी सामाजिक संदेश देण्याचे काम सौ. पल्लवी काशिनाथ गोगुले करतात. यावर्षी सौ. गोगुले यांनी स्वागत गौराईचे तसेच गर्भातील लेकीचे…असा देखावा सादर केला आहे . यात निषेध स्त्रीभ्रूणहत्येचा, हाच खरा सन्मान गौराईचा, मुलगी वाचवा मुलगी शिकवा, मुलीला कमी समजू नका तीच मुलगी उत्तम गृहिणी शिक्षिका डॉक्टर पोलीस अधीक्षक कलेक्टर पंतप्रधान राष्ट्रपती व चंद्रावर सुद्धा मुलगी जाऊ शकते, जिच्या हाती आहे पाळण्याची दोरी तीच जगाचा उद्धार करी असे त्यांनी प्रतिमेतच गौराईचे रूप दाखवले आहे हा सामाजिक संदेश गोगुले परिवाराने दिला.
माऊली नगर गेवराई येथील सौ.पल्लवी काशिनाथ गोगुले यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ हा देखावा सादर केला असून त्यामध्ये त्यांनी एक गर्भवती स्त्री दाखविली आहे. गर्भलिंग निदान करणे हा कायद्याने गुन्हा आहे. मुलगी वाचवा मुलगी शिकवा. तीच मुलगी पुढे शिक्षिका डॉक्टर पोलीस अधीक्षक कलेक्टर पंतप्रधान राष्ट्रपती चंद्रावर सुद्धा जाऊ शकते याचा हुबेहूब देखावा सादर केलेला आहे. देखाव्यातून शिक्षिका विद्यार्थ्यांना शिकवताना दाखविले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय दाखविले आहे. पंतप्रधानांना भाषण करताना दाखविले आहे .पोलीस अधिकारी यांना दाखविले आहे. राष्ट्रपती यांचे कार्यालय कार्यालय दाखविले आहे. शेतकरी महिला शेतात काम करताना सुद्धा दाखविले तर चंद्रावर गेलेल्या मुलीला सुद्धा दाखविले आहे. हा हुबेहूब देखावा त्यांनी गौरी पुजनाच्या निमित्ताने सादर केला आहे. भिंतीवरील स्लोगन आकर्षित करतात. गौरी गणपतीच्या सणाचे औचित्य साधून बेटी बचाव बेटी पढाओ हा देखावा सादर केला आहे.
सौ. गोगुले पल्लवी यांनी या देखाव्यातून सामाजिक संदेश दिला आहे. त्यामुळे सौ. गोगुले यांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत असून देखावा पाहण्यासाठी महिलांची गर्दी वाढत आहे.