धार्मिक

आळंदी पोलीस स्टेशन, आळंदी नगरपरिषद, एम. एस . ई .बी.यांनी संयुक्त पणे विसर्जन मिरवणुकीत अडथळा येणाऱ्या बाबी बाबत रस्त्यांची केली पाहणी*

*आळंदी पोलीस स्टेशन, आळंदी नगरपरिषद, एम. एस . ई .बी.यांनी संयुक्त पणे विसर्जन मिरवणुकीत अडथळा येणाऱ्या बाबी बाबत रस्त्यांची केली पाहणी*

 

सार्वजनिक गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये गतवर्षी आलेल्या आडथळ्यांची पाहणी आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे. आळंदी नगर परिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे. एम.एस.ई.बी.विभागाचे संदीप पाटील. आणि शांतता कमिटी सदस्य डी डी भोसले पाटील, व प्रकाश कुऱ्हाडे पाटील, तसेच आळंदी नगरपरिषद कर्मचारी एम एस ई बी कर्मचारी आणि पोलीस शिपाई वर्ग यांच्या संयुक्त विद्यमानाने पाहणी करण्यात आलेली आहे. विसर्जन मिरवणूक आळंदी मध्ये निघाली असता. चाकण चौक मार्गे भैरवनाथ मंदिर, हजेरी मारुती मंदिर, चावडी चौक,आळंदी पोलीस स्टेशन मार्गे नगरपालिका चौक, आणि शेवटी इंद्रायणी तीरावर जाण्यासाठी माऊलींच्या मंदिराजवळील महाद्वार चौक. अशा मार्गाची पाहणी करत येणाऱ्या विविध अडथळा बाबत समीक्षा करण्यात आली. यामध्ये विद्युत तारांच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असतात त्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी या गोष्टी निदर्शनास आणत कारवाई करण्यासाठी एमएसईबी ला सूचना केल्या आहेत. आळंदी एम एस ई बी कर्मचारी अजित घुंडरे. यांना याबाबत सूचना करत विसर्जन मिरवणुका वेळेत आणि सुरळीत पार पडणे बाबत सूचना करण्यात आल्या आहे. त्याचबरोबर आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे. नगरपरिषद सार्वजनिक रस्ते विभाग संजय गिरमे. बांधकाम विभाग सचिन गायकवाड. यांनीही पाहणी करत ड्रेनेज लाईनचे झाकण. रस्त्यावरील खड्डे. खोदकाम .हे सुरळीत मिरवणुका पार पाडण्यासाठी पाहाणी करत डागडुजी आणि ईतर पर्याय बाबत तयारी करण्याच्या अनुषंगाने पावले उचलली आहेत. आळंदी शांतता कमिटीचे डी डी भोसले पाटील व प्रकाश कुऱ्हाडे पाटील. तसेच आळंदी पोलीस स्टेशन आळंदी नगरपरिषद आळंदी महावितरण विभाग सर्वांच्या एकत्रित अनुषंगाने झालेल्या पाहणीमध्ये विसर्जन मिरवणुका वेळेत पार पाडणे बाबत चर्चा करण्यात आली आहे. गतवर्षी ज्या अडथळ्यांमुळे विसर्जन मिरवणूकाना वेळ लागत होती. त्यामध्ये विशेषता एम एस सी बी च्या घरगुती वापराच्या विद्युत जोडमध्ये असणाऱ्या लाईन बाबत विशेष सूचना देण्यात आल्या आणि विसर्जन मार्ग पूर्णपणे अतिक्रमण मुक्त ठेवण्याची ही कारवाई करण्यात आलेली आहे

1/5 - (1 vote)
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे