वडगाव ढोक येथे जेष्ठ गौरी गणपतीचे घरोघरी मनोभावे पुजन
वडगाव ढोक येथे जेष्ठ गौरी गणपतीचे घरोघरी मनोभावे पुजन
गौराई आली सोनपावलांनी. गौराई आली. माणिक मोतींच्या पावलांनी.. असे म्हणत वडगाव ढोक ग्रामीण भागात गुरुवारी सर्वत्र सर्वांच्या लाडक्या गौराईचे आगमन झाले. तसेच शुक्रवारी गौरी गणपती चे घरोघरी मनोभावे पुजन करण्यात आले. यावेळी घरोघरी गौराईंच्या पुजनासाठी महिला वर्गांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.
तीन दिवसांची पाहुणी असलेल्या गौराईंचे गुरुवारी घरोघरी आगमन झाले. माहेरवाशीण म्हणून गौराईचे स्वागत करण्यासाठी महिलांमध्ये मोठा उत्साह असतो.नव्या साड्या, अंगभर दागिने, नथ, पंचपक्वान्नांचे ताट या पारंपरिक पद्धतीने गौराईचे स्वागत शुक्रवारी जेष्ठा गौराईंचे घरोघरी मनोभावे गौरी पूजन करण्यात आले.
गौरी गणपती सणानिमित्त गेवराई तालुक्यातील. वडगाव ढोक येथे पत्रकार गणेश भाऊ ढाकणे व सौ रोहिणी गणेश ढाकणे यांच्या निवास्थानी गौराईची आकर्षक सजावट करण्यात आली. शुक्रवारी सायंकाळी घेतलेले छायाचित्र