गुन्हेगारी

सावधान अपहरण करणारी टोळी राहुरी तालुक्यात सक्रिय *बारागांव नांदूर येथे चिमुकल्यांचे अपहरण टळले*.

सावधान अपहरण करणारी टोळी राहुरी तालुक्यात सक्रिय *बारागांव नांदूर येथे चिमुकल्यांचे अपहरण टळले*.

 

 

 

राहुरी तालुक्यातील असलेल्या बारागांव नांदूर येथील मंडलिक आखाडा परिसरात मजुरीकरणाऱ्या परप्रांतीय परिवारातील एक सात वर्षीय चिमुकलीचा प्रयन्त फसला अपहरण कर्ते पसार झाले . बारागांव नांदूर येथील मंडलिक आखाडा परिसरात मंडलिक यांचे गुरहाळ असून याठिकाणी उत्तर प्रदेशातील काही मजूर कामासाठी आहेत.या परिवारातील चिमुकली हि गुरहाळाजवळ मोकळ्या जागेत खेळत असताना सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान शेजारील ऊसातून आलेल्या चार ते पाच जणांच्या टोळक्याने येऊन सदर चिमुकलीला उचलून नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी चिमुकलीच्या मोठ्या भावाने जोरजोरात आरडाओरड करायला सुरुवात केली असता परिसरातील मंडळी व काही नागरिक जमा झाले.  

माणसांची झालेली गर्दी पाहुन सदर टोळक्याने शेजारील ऊसातून वाट काढत पलायन केले.हि घटना परिसरात कळताच बारागांव नांदूर येथील ३५० ते ४०० युवकांनी या घटनास्थळी गर्दी केली.अपहरण करण्यासाठी आलेल्या टोळक्याला ऊसातील शेतात शोधण्याचा प्रयत्न केला परंतू कुणीही आढळून आले नाही. सदर घटनेची माहिती राहुरी पोलीसांना कळवली असता रात्री उशीरापर्यंत पोलीसांनी कुठलीही हालचाल केलेली नव्हती.या घटनेमुळे बारागांव नांदूर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तसेच पालक वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे