आदिवासी महिलेचा वांगी बुद्रुक मध्ये विनयभंग.

आदिवासी महिलेचा वांगी बुद्रुक मध्ये विनयभंग.
श्रीरामपूर तालुक्यातील वांगी बुद्रुक मध्ये पवार कुटुंब राहते जमिनीच्या वादातून घरी कुणी नसताना महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केल्याचा गुन्हा श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे दाखल झाला.
असून याबाबत अधिक माहिती अशी की संबंधित महिला घरामध्ये काम करत असताना आरोपी रामा दौलत पवार यांनी फिर्यादीस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून खाली पाडून आरोपी यांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
तसेच फिर्यादी महिलेची छेडछाड करत असताना आरडाओरडा केल्याने फिर्यादीची सासू तिथे आल्याने तिने सर्व प्रकार पाहिल्यावर आरोपीनी फिर्यादीच्या सासूच्या छातीवर धारदार वस्तूने वार केल्याची घटना घडलेली आहे.
संबंधित जखमी महिला साखर कामगार हॉस्पिटल श्रीरामपूर येथे दाखल केले आहे. तसेच आरोपीचे पती व नणंद यांना मारहाण झाल्याने, याबाबत आरोपी रामा पवार अनिल पवार सुरेश हुलगे यांच्यावर 354 324 504 506 34 प्रमाणे गुन्हा दाखल असून पुढील तपास श्रीरामपूर पोलीस स्टेशन करत आहे.