कृषीवार्ता
टाकळीभान येथे शाॅर्टसर्कीटमुळे दीड एकर उसाचे पिक आगीच्या भक्ष्यस्थानी.

टाकळीभान येथे शाॅर्टसर्कीटमुळे दीड एकर उसाचे पिक आगीच्या भक्ष्यस्थानी.
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे शाॅर्टसर्कीटमुळे दीड एकर उसाचे पिक आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. ही घटना गुरूवारी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगीतले.
टाकळीभान येथे श्रीरामपूर—नेवासा राज्यमार्गालगत गट नं १८६ मध्ये योगेश टाकळकर यांचे दीड एकर उसाचे क्षेत्र आहे. थोड्याच दिवसात या उसाला तोड येणे अपेक्षीत असतानेच काल दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास येथील विद्युत तारांच्या शाॅर्टसर्कीटमुळे उसाला आग लागली. उन्हाचा भर असल्यामुळे क्षणार्धात आगीने रौद्र रूप धारण केले. व काही कळायच्या आतच दीड एकर उसाचे पिक आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. यावेळी परिसरातील नागरीकांनी कारखान्याच्या अग्नीशमन दलाच्या बंबाला फोन करून पाचारण केले. मात्र तोपर्यंत पंच्याहत्तर टक्क्याच्या आसपास उसाचे पिक जळाले होते. यावेळी उपस्थित परिसरातील नागरीकांनी अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र उन्हाच्या तीव्रतेपुढे ते शक्य झाले नाही. अग्नीशमन बंबाने येताच पाण्याचा मारा सुरू केला. परिणामी शेजारी आसणार्या उस तसेच गव्हाच्या पिकांना या आगीपासून वाचविण्यात यश मिळाले. सदर शेत मालक योगेश टाकळकर हे बाहेरगावी वास्तव्यास असल्याने त्यांना या घटनेची माहीती मिळताच ते त्वरीत टाकळीभान येथे आले.
गट नं १८६ मधील टाकळकर यांच्या शेतातून महावितरणचे लाईन जात असून या तारांना झोळ पडलेले आहे. या झोळामुळे तारांची स्पार्कींग होवून आग लागल्याचे प्रत्यदर्शींनी यावेळी सांगीतले. तरी सदर पोल सुरक्षीत ठिकाणाहून शिप्ट करण्यात यावेत जेणेकरून भविष्यात अशी घटना घडणार नाही. असे मत शेतमालक योगेश टाकळकर यांनी व्यक्त केले.
Rate this post