कुरणपुर येथील बारा शेतकऱ्यांच्या वीज मोटारीच्या केबलची एकाच रात्री चोरी.

कुरणपुर येथील बारा शेतकऱ्यांच्या वीज मोटारीच्या केबलची एकाच रात्री चोरी.
कुरणपुर तालुका श्रीरामपुर येथील प्रवरा नदीपात्रातील अनेक शेतकऱ्यांच्या वीज मोटारीच्या केबल एका रात्रीत चोरीला गेल्या असुन दिड महीन्यापूर्वीही अशाच प्रकारे केबल व मोटारी चोरीस गेलेल्या होत्या या बाबत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी लोणी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे कुरणपुर येथील शेतकऱ्यांनी शेतीला पाणी देण्यासाठी प्रवरा नदी पात्रात वीज मोटारी टाकून शेतीला पाण्याची व्यवस्था केली होती. परवा रात्रीच्या वेळेस अनेक शेतकऱ्यांच्या वीज मोटारीच्या केबल चोरीस गेलेल्या आहे. यात दत्तात्रय लक्ष्मण महानोर यांची साधारण तीनशे फुट काँपर केबल अंदाजे किंमत ९००० रुपये लक्ष्मण रामजी चिंधे यांची साधारण ९००० हजार रुपये किमतीची तीनशे फुट काँपर केबल पंकज ज्ञानदेव हळनोर यांची रुपये ९००० किमतीची साधारण तीनशे फुट काँपर केबल नामदेव सहादु थोरात यांची रुपये ७००० किमतीची वीज मोटारीची काँपर केबल विठ्ठल सोपान व्यवहारे यांची तीनशे फुट काँपर केबल राजेंद्र सुखदेव हळनोर यांची तीनशे फुट काँपर केबल आण्णासाहेब सोन्याबपु जाटे यांची तीनशे फुट केबल विठ्ठल भागवत देठे यांची तीनशे फुट केबल दत्तात्रय भानुदास राऊत यांची तीनशे फुट केबल जयवंत नारायण देठे यांची तीनशे फुट केबल सतीश चंद्रभान हळनोर यांची वीज मोटारीवरील केबल आबासाहेब आण्णासाहेब पारखे यांची वीज मोटारीवरील तीनशे फुट केबल अशा एकुण बारा शेतकऱ्यांच्या वीज मोटारीच्या केबल अंदाजीत किंमत एक लाख रुपये किमतीच्या चोरीस गेल्या असुन एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरी होण्याची ही दुसरी घटना आहे यापूर्वीही अशाच प्रकारे अनेक शेतकऱ्यांच्या वीज मोटारीच्या केबल व तीन शेतकऱ्यांच्या विज मोटारी चोरीस गेलेल्या होत्या त्या चोरीचा तपास लागला नाही केबल चोरीसा गेलेल्या शेतकऱ्यांनी नविन केबल खरेदी करुन शेती वीज पंप सुरु केले होते पुन्हा तसाच प्रकार घडला असुन या बाबत सर्व शेतकऱ्यांनी लोणी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असुन या चोरांचा तातडीने छडा लावावा व शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे