गुन्हेगारी

जुन्या भांडणातून प्राणघातक हल्ला 307 दाखल ; तरुण गंभीर जखमी

जुन्या भांडणातून प्राणघातक हल्ला 307 दाखल ; तरुण गंभीर जखमी

 

जुने भांडण मिटविण्यासाठी बोलावलेल्या बैठकीतच बारा जणांनी संगणमत करुन एका तरुणाच्या डोक्यात कुर्हाड घालून लाठ्या काठ्याने जबर मारहाण केली. या घटनेत सदरील तरुण गंभीर जखमी झाला असून अन्य तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. हि घटना गेवराई तालुक्यातील पोखरी येथे मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली असून जखमी तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी 12 आरोपींविरुद्ध 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील पोखरी येथील सर्फराज बनेमिया शेख हा चार दिवसांपूर्वी मस्जिदीत नमाज पठण करण्यासाठी गेला होता. यावेळी त्याचे गावातीलच काही तरुणाशी वाद झाला होता. यावेळी सर्फराज याच्या हाताला दुखापत झाल्याने त्याने याप्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. दरम्यान पोलिसांनी उपचारासाठी पत्र दिल्याने तो जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. दरम्यान रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर काही मौलानाच्या उपस्थितीत मंगळवारी पोखरी येथील मस्जितमध्ये सदरील भांडण मिटवण्यासाठी मंगळवारी रात्री बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीत पुन्हा मागील भांडणाची कुरापत काढून रफिक बशीर शेख, शफिक नसीर शेख, मोहिजीन शेख, जावेद इमान शेख, जाफर उस्मान शेख, आब्बास हमीद शेख, मोहिन शेकनूर शेख, सोहेल हमीद शेख, तौफिक रशीद शेख, वसीम यासीन शेख, अरमान शेखसह अन्य एक अशा बारा जणांनी संगणमत करुन सर्फराज शेख याला लाठ्या काठ्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी सरताज बनेमिया शेख, बनेमिया शेख, नौशाद सलीम शेख यांना देखील मारहाण करण्यात आली असून यामध्ये सर्फराजच्या डोक्यात कुर्हाडीचा जबर घाव लागल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. दरम्यान सर्फराज याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. बुधवारी सकाळी गेवराई पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन गंभीर जखमी असलेल्या सर्फराज याचा जवाब नोंदवला असून वरील बारा आरोपींविरुद्ध कलम 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे