ज्ञान माऊली शाळेत क्रीडा महोत्सव केला साजरा

ज्ञान माऊली शाळेत क्रीडा महोत्सव केला साजरा
ज्ञानमाउली शाळेचा क्रिडा महोत्सव हा जोरदार स्वरूपात चालू आहे. त्याचेच औचित्य साधून
सर्व धर्म समभावाची संकल्पना जोपासून तसेच देशातील सर्व वेष भुषा, भाषा ह्यांचा मान राखत हया फेरीत विविधतेने नटलेला जिवंत देखावा मुलांकडून सादर करण्यात आला. हि फेरी चांदा चौक, परीट गल्ली आणि घोडेगाव ह्या ठिकानाहून काढण्यात आली.
शाळेत 23 जानेवारी पासून शालेय क्रिडा स्पर्धा घेण्यात येत आहे. क्रिडा महोत्सवाच्या सुरुवातीला उद्घटनासाठी DYSP संदीप मिटके व API माणिक चौधरी तसेच SPI थोरात सर ह्यांची प्रमूख पाहुणे म्हणुन उपस्थिती लाभली. त्यानित देखील मुलांना मार्गदर्शन करून स्वहस्ते खेळून क्रिडा दिनाचे उद्घाटन केले.
तेथपासून 30 जानेवारी 2023 पर्यंत हया स्पर्धा चालू राहतील. 31 जानेवारी 2023 रोजी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजीत केला गेला आहे. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून Add. SP. स्वाती भोर ह्या उपस्थीत राहणार आहे. त्याच बरोबर जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले ह्या देखील उपस्थीती दर्शविणार आहेत. ह्या कार्यक्रमाची पूर्व तयारी शाळेचे मॅनेजर फा. सतीश कदम व प्राचार्य फा. डॉमिनिक ब्राम्हणे ह्यांनी उत्कृष्टप्रकारे शिक्षकाकडून करवून घेतली.