धार्मिक
गेवराई आगारातून अष्टविनायक दर्शनासाठी बस सेवा सुरू

गेवराई आगारातून अष्टविनायक दर्शनासाठी बस सेवा सुरू
गेवराई आगारातून अष्टविनायक दर्शनासाठी बस रवाना
आज दि.25.08.2023 रोजी प्रवाशांच्या मागणीनुसार गेवराई आगाराची बस अष्टविनायक दर्शनासाठी बीड विभागाचे विभाग नियंत्रक माननीय अजय कुमार मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रवाना करण्यात आली.राप महामंडळातर्फे सदरची सेवा प्रवाशांच्या मागणीनुसार अष्टविनायक दर्शन,ज्योतिर्लिंग दर्शन,दर महिन्याच्या एकादशीला पंढरपूर वारीसाठी व इतर तीर्थक्षेत्र दर्शनासाठी दर महिन्याच्या शनिवारी व रविवारी देण्यात येणार आहे.गेवराई तालुक्यातील ज्या ज्या प्रवाशांना या तीर्थक्षेत्रासाठी बस घेऊन जायचे आहे त्यांनी गेवराई आगाराचे आगार प्रमुख श्री सिद्धार्थ सोनवणे श्री तागड साहेब व श्री आरगडे साहेब यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आगार प्रशासनातर्फे करण्यात आलेले आहे.