आदर्श विद्या मंदिर शाळेत पालक मेळावा उत्साहात संपन्न

आदर्श विद्या मंदिर शाळेत पालक मेळावा उत्साहात संपन्न
दि. २४/०८/२०२३ रोजी
आदर्श विद्या मंदिर सोनई (प्राथमिक) विद्यालयात LKG व UKG या वर्गाचा पालक मेळावा पर पडला. एकूण ३०० पालकांपैकी २७० पालक उपस्थित होते. ह.भ.प. सोमनाथ महाराज गडाख यांनी पालक म्हणून मार्गदर्शन केले तसेच शाळेचे मुख्याधापक श्री.अनिल दरंदले सर यांनी सर्व विषयाला हात घालून मुलांच्या सर्वांगीण विकास करायचा असेल तर स्पर्धेच्या युगात शिक्षकांइतके पालकांनीही मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे पालकांना निदर्शनास आणून दिले.
तसेच मुलांच्या दैनंदिन सवयी, संस्कार, बालहट्ट, बोलण्याची व अभ्यासाची सवय, मोबाईल न हाताळणे, इतरांशी आदरयुक्त बोलणे. शाळेत महिन्याला भेट. विद्यार्थी अहवाल पाहणे अश्या सूचना पालकांना केल्या. तसेच स्कूल बस व अभ्यासाविषयी तक्रार याबद्दल हि पालकांचे म्हणणे श्री. मुख्याध्यापक सरांनी एकूण घेतले. त्यातील बऱ्याच पालकांनी शाळेचा शैक्षणिक दर्जा चांगला असून भौतिक सुविधाची उणीव आहे असे सांगितले. संपूर्ण मेळावा हा खेळीमेळीच्या वातारणात पर पडला. सादर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. नन्नवरे मॅडम यांनी केले.