टाकळीभानच्या शंभु महादेव याञेच्या लोकवर्गणीचा आज शुभारंभ.

टाकळीभानच्या शंभु महादेव याञेच्या लोकवर्गणीचा आज शुभारंभ.
टाकळीभान आणि पंचक्रोशिचे ग्रामदैवत आसलेल्या शंभु महादेवाचा याञौत्सव येत्या २४ व २५ एप्रिल रोजी साजरा केला जाणार आसल्याने याञा समितीने याञा पुर्व तयारी सुरु केली आसल्याने स्थानिक प्रमुख नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आज सोमवारी शंभु महादेवाला नारळ वाढवुन लोकवर्गणीचा शुभारंभ करण्यात आला.
शंभु माहादेव मंदिर परीसरात पार पडलेल्या या बैठकित सर्वांनी याञौत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी याञा कमेटीला सहकार्य करण्याबाबत चर्चा झाली. काही ग्रामस्थांनी याञे सोबतच टांगा शर्यती घेण्याची मागणी केली. माञ जुन्या रुढी प्रमाणे टांगा शर्यती महाशिवराञीच्या दिवशीच घेण्याबाबत या बैठकित बहुमत झाल्याने टांगा शर्यती साठी अनुभवी नागरीकांची एक कमेटी करुन ही कमेटी याञा कमेटीला सोबत घेवुन टांगा शर्यती भरवणार आसल्याचे बैठकित स्पष्ट करण्यात आले.
यावेळी जेष्ठ नेते ज्ञानदेव साळुंके, शिवाजी शिंदे, राजेंद्र कोकणे, यशवंत रणनवरे, कान्होबा खंडागळे,मयुर पटारे जयकर मगर, दत्ताञय नाईक, राहुल पटारे, भाऊसाहेब पवार, गजानन कोकणे, अनिल पटारे, बाबासाहेब तनपुरे, पाराजी पटारे, बाबासाहेब बनकर, विलास दाभाडे, सुधीर मगर, मधुकर गायकवाड, श्रीधर गाडे, बापुसाहेब शिंदे, शिवाजी पटारे, राजेंद्र गाढे, बंडुतात्या कोकणे, राजेंद्र देवळालकर, संजय पटारे, पांडु मगर, विष्णु पटारे, पञकार आदींसह भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.