अपघात

अल्पवयीन मुलीची आत्महत्या, तालुक्यातील तीन दिवसातली दुसरी घटना पालकांमध्ये भीतीचे वातावरण 

वेताळवाडीत अल्पवयीन मुलीची आत्महत्या,

तालुक्यातील तीन दिवसातली दुसरी घटना

पालकांमध्ये भीतीचे वातावरण 

 

तीन दिवसांपूर्वी तालुक्यातील बीडसांगवी येथे आजोळी राहणाऱ्या एक अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. हि घटना ताजी असतानाच बीडसांगवी या गावाजवळच असलेल्या वेताळवाडी येथिल एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन बुधवारी राञी जिवनयाञा संपवली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असुन पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील वेताळवाडी येथील प्रतिक्षा सुरेश वनवे (१६) हिने बुधवार दि. 29 रोजी रात्री 7:00 वा. च्या दरम्यान राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. नातेवाईकांच्या माहितीनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला. या आत्महत्याचे कारण अद्याप कळवु शकले नाही. आष्टी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे