बेलापुरात श्री स्वामी समर्थ केंद्राचे मान्यवरांच्या हस्ते भुमिपुजन

बेलापुरात श्री स्वामी समर्थ केंद्राचे मान्यवरांच्या हस्ते भुमिपुजन
श्री स्वामी समर्थ अध्यात्मीक बाल संस्कार केंद्राचे भुमीपुजन विविध मान्यवरांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले या वेळी सर्व मान्यवरांनी गावाच्या वैभवात भर टाकणारे हे संस्कार केंद्र असुन केंद्र उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य करावे असे अवाहन केले श्री स्वामी समर्थ केंद्रांची बेलापुरात सन १९९१ ला सुरुवात झाली सुरुवातीला हे केंद्र महादेव मंदीर येथे सुरु झाले या केंद्रास व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लढ्ढा यांनी जागा उपलब्ध करुन दिली सन २०१७ पासुन नविन जागेत श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक बाल संस्कार केंद्र सुरु करण्यात आले या ठिकाणी जागा उपलब्ध होती परंतु या ठिकाणी चांगले संस्कार केंद्र उभे रहावे ही अनेक सेवेकऱ्यांची मनापासुन ईच्छा होती अखेर विविध मान्यवरांच्या हस्ते या केंद्राचा भुमीपुजन सोहळा संपन्न झाला त्या वेळी जि प सदस्य शरद नवले बेलापुर सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले टँक्सी असोसिएशनचे अध्यक्ष सुनिल मुथा ,प्रशांत लढ्ढा शांतीलाल हिरण आप्पासाहेब थोरात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक सुवालाल लुक्कड रविंद्र खटोड सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे साहेबराव वाबळे आदिंनी मनोगत व्यक्त केले या वेळी प्रताप सरोदे ,उंदिरगाव केंद्र भारत कोळसे, राधु पवार ,दिनेश वैद्य, बाबासाहेब शेटे, हिम्मतराव धुमाळ, प्रदेश तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ नागले, किरण भांड, ज्योतीताई भांड, भगीरथ मुंडलीक, कैलासा देसाई , दत्तात्रय कुऱ्हे ,योगेश शिंदे ,जनार्धन शिंदे ,विलास कुऱ्हे ,जालींदर गाढे ,अशोक राशिनकर ,विजर धुमाळ आदिसह असंख्य सेवेकरी उपस्थित होते या वेळी महीला सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ कल्पना थोरात यांनी केले तर सूत्रसंचलन पत्रकार देविदास देसाई यांनी केले शेवटी विठ्ठल गाडे मामा यांनी आभार मानले