ज्ञानमाऊली शाळेत दहावीच्या मुलांचा निरोप समारंभ संपन्न.

ज्ञानमाऊली शाळेत दहावीच्या मुलांचा निरोप समारंभ संपन्न.
दिनांक २१, फेब्रुवारी, मंगळवार आज सकाळी १०.०० ते १२.३० हया वेळेत शाळेच्या भव्य क्रीडांगणावर दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला. त्यासाठी ज्ञानोदय शाळेचे मुख्याध्यापक श्री. जनार्दन पटारे सर तसेच ज्ञानमाऊली शाळेचे माजी विद्यार्थी शुभम चव्हाण, निखिल छल्लाणी व वैशाली झरेकर हे आवर्जुन उपस्थित राहिले.
त्यांनी त्यांच्या भाषणातून सध्याच्या दहावीच्या मुलांना बहुमूल्य मार्गदर्शन केले. त्यांचा अनुभव व शाळेतून बाहेर पडल्यानंतरचा प्रवास कसा होता ह्याबद्दल त्यांनी उदाहरणासह भाष्य केले. हा सर्व कार्यक्रम कर्डीले सर आणि त्यांच्या नववीच्या मुलांनी अतिशय नियोजनबद्ध पार पाडला. त्यांनी विविध प्रकारचे नृत्य तसेच विशिष्ट कॉमेडी भाषा शैलीत त्यांचे भरभरून कौतुक केले. दहावीच्या मुला- मुलींनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले व सर्व शिक्षकांचे आभार मानले तसेच शाळेला भेट म्हणून काही वस्तु दक्षिणा म्हणून दिल्या. फा. मॅनेजर ह्यांनी देखील सर्व मुलांचे कौतुक करत त्यांच्या आगामी परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. प्रिन्सिपल फा. डॉमिनिक ब्राम्हणे ह्यांनी आपल्या भाषणातून दहावीच्या मुलांचा धावता आढावा घेतला व हेड बॉय चैतन्य जावळे आणि हेड गर्ल प्रिती गायकवाड ह्यांचे कौतुक करत सर्व मुलामुलींना ध्येय डोळ्यासमोर ठेवून परीक्षेसाठी सज्ज होण्यास आवाहन केले. सर्व सोहळा नयनरम्य असा होता. दहावीचे सर्व यावेळी दहावीच्या मॉडम मारिया यांचा सत्कार करण्यात आला विद्यार्थी-विद्यार्थिनीनी शाळेच्या शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यासोबत विठ्ठल कामत हॉटेल मध्ये जेवणाचा आस्वाद घेत कार्यक्रमाचा समारोप झाला.