राजकिय

दादासाहेब माळी व संजय पवार यांच्यासह अनेकांचा राष्ट्रवादी मध्ये प्रवेश 

दादासाहेब माळी व संजय पवार यांच्यासह अनेकांचा राष्ट्रवादी मध्ये प्रवेश 

 

दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अमरसिंह पंडित 

 

 तालुक्यातील बेलगांव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गोपाळ वस्तीवरील दादा माळी व त्यांच्या समवेत अनेक युवकांनी मा आ अमरसिंह पंडित यांच्या नेतृवावर विश्वास ठेऊन राष्ट्रवदी कॉग्रेंस पार्टीमध्ये प्रवेश केला तसेच यावेेळी आपण दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे यावेळी मा आ अमरसिंह पंडित यांनी सांगितले आहे 

 

   गोपाळ वस्तीवरील आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी व्यासपिठावर दादा माळी संजय पवार राधेश्याम चक्कर माऊली नवले राम कदम आमजत पठाण गजानन काळे गजू सोंळूखे यांची उपस्थिती होती पुढेे बोलतांना ते म्हणाले की आपल्या गेवराई तालुक्याची अर्थवाहीनी असलेल्या जय भवनी सहकारी साखर कारखाना हा डिसेंबर महिन्यापर्यंत २२ किलोमीटर पर्यंतचा ऊस बैलगाडीने उचलनार आहे तसेच गाळप क्षमता देखील वाढणार आहे तसेच हा कारखाना मराठवाड्यातील एकमेव साखर कारखाना असेल जो पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाना याला प्रतिस्पर्धी ठरू शकतो यात कुनालाही नवल वाटायला नको कारण ज्या काही संस्था आमच्या ताब्यात आहेत ती कुनाचाही जाहीगिरी नाही कारण गेवराई बाजार समिती असो जय भवानी सहकारी कारखाना असो किंवा शैक्षणिक संस्था या मालकीच्या नाहीत यामध्ये काम करत असतांना आम्ही कुठेही राजकीय वैर घेऊन काम करत नाही म्हणून ह्या संस्था चालतात तसेच आपल्या गेवराई तालुक्याच्या ग्रामिण भागात शिक्षणाचा टक्का देखील वाढलेला आहे र भ अट्टल महाविद्यालयाला चा दर्जा मिळाला आहे ही अभिमानास्पद बाब आहे तसेच आज कुठलीही सत्ता नसतांना आपण माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही असेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले यावेळी विजय माळी रामदास माळी सुभाष माळी ज्ञानेश्वर माळी रमेश माळी हरीभाऊ माळी गोरख माळी दिलीप माळी विश्वजित माळी संभाजी माळी बंन्सी गव्हाणे आकाश माळी बाबू माळी लक्ष्मण माळी विकास माळी नवनाथ माळी वैजिनाथ माळी बबण माळी अनिल कोळेकर बबण धनगर रामदास सकार्डे पोपट माळी , गणेश माळी भाऊसाहेब धनगर अक्षय गायकवाड अजय मराठे अभिषेक सोनवणे रामभाऊ गव्हाणे शिवाजी कोळेकर बबण धनगर सुनिल माळी पिनू माळी , दादा माळी बाळू माळी परशूराम माळी संभाजी गव्हाणे कृष्णा गव्हाणे मोहन माळी आकाश माळी विकास माळी गोंविद माळी सोनाजी माळी दादासाहेब माळी तूकाराम माळी बप्पा माळी संभाजी माळी मधूकर माळी शिवाजी माळी परमेश्वर माळी रामेश्वर माळी ईत्यादीनी यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेंस पार्टी मध्ये प्रवेश केला तसेच मा आ अमरसिंह पंडित यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले .यावेळी असंख्य नागरिक उपस्थित होते

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे