विविध विकासकामांसाठी टाकळीभान ग्रामपंचायतच्या वतीने ना.विखे पाटील यांना निवेदन.

विविध विकासकामांसाठी टाकळीभान ग्रामपंचायतच्या वतीने ना.विखे पाटील यांना निवेदन.
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील विविध विकास कामाचे निवेदन ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांना देण्यात आले.
माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखालील शिष्टमंडळाने येथील ग्रामीण पाणीपुरवठा योजनेसाठी निधी वाढवून मिळणे, टाकळीभान कमान ते घोगरगाव रस्ता ओढ्यापर्यंत दुहेरी कामास निधी मिळणे, गावासाठी ५ हायमॅक्स मिळणे, टाकळीभान(महादेव मंदीर)ते बेलपिंपळगाव रस्ता डांबरीकरणासाठी निधी मिळणे, टेलटॅंकमध्ये पाणी सोडणार्या कॅनोलचे खोलीकरण व रूंदीकरण करणे, चारी क्रं. १६ चे रूंदीकरण व खोलीकरणासाठी निधी मिळणेबाबतचे निवेदन सरपंच टाकळीभान ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आले आहे. तसेच उपसरपंच कान्हा खंडागळे व टाकळीभान ग्रामस्थांच्या वतीनेही ना.राधाकृष्ण विखे पाटील यांना विविध स्वरूपाच्या विकासकामांचे निवेदन देण्यात आले आहे. यामध्ये मौजे टाकळीभान येथील प्राथमीक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी पद क्रं.२ नेमणूकीबाबत, टाकळीभान ते घोगरगावरस्ता ओढ्यापर्यंत दुहेरी कामाबाबत, प्राथमीक आरोग्य केंद्रास १०८ रूग्णवाहीका मिळणेबाबत, जि.प.केंद्र शाळा इमारत दुरूस्त करणे व मोकळी जागा बी.ओ.टी. तत्वावर विकसनासाठी मिळणेबाबत, महादेव मंदीर देवस्थान, विठ्ठल मंदीर देवस्थान, साईबाबा मंदीर यांचा क वर्ग तीर्थक्षेत्र मध्ये समावेश करून निधी मिळणेबाबत, टाकळीभान(महादेव मंदीर) ते बेलपिंपळगाव रस्ता डांबरीकरणाबाबत, गावालगत फुटपाथ रस्ता व स्र्टीट लाईट बसविणेबाबत, टाकळीभान ते बेलपिंपळगाव रस्ता ( कांबळे वस्ती) डांबरीकरणाबाबत, १०० केव्हीचे नवीन वीज रोहीत्र मिळणेबाबत, टाकळीभान ते बेलपिंपळगाव—पढेगाव लगत हनूमान गड पर्यंत रस्त्याच्या कामाबाबत, येथील खेळाडूंना क्रिंडागण विकसीत करणेकामी निधी मिळणेबाबत, कबड्डी मॅट मिळणेबाबत मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी उपसरपंच कान्हा खंडागळे, सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष राहुल पटारे, शिवाजीराव शिंदे, ग्रा.पं.सदस्य मयुर पटारे, मधुकर कोकणे, भाऊसाहेब पवार, सुधीर मगर, यशवंत रणनवरे, भाऊसाहेब पटारे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.