धार्मिक

ज्ञानमाऊली शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी. 

ज्ञानमाऊली शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी. 

 

दिनांक. १९ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ज्ञानमाऊली शाळेत शिवजयंतीचा सोहळा मोठ्या थाटात पार पडला. ह्यावेळी सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी विविध वेषभूषा करून वेळेवर उपस्थित होते. ह्या कार्यक्रमाचे नियोजन ८वी व १०वीच्या वर्गाने सुव्यवस्थितपणे केले. १०वी च्या वर्गातील सायली झाडे हिने राजमाता जिजाऊ ह्यांची प्रतिमा तर २री च्या आर्यन ब्राम्हणे ह्याने छ. बालशिवाजी ह्यांची प्रतिमा वेशभूषेत साकारली. शाळेतल्या मुलांनी त्यांच्या भाषणातून छ. शिवाजी महाराजांचे प्रतिरूप इतर विद्यार्थ्यांसमोर मांडले. तसेच दरंदले मॅडम, शिंदे सर, आंग्रे सर हया शिक्षकांनीही महाराजांच्या जिवन चरित्रावर आणि त्यांच्या शौर्यावर प्रखर भाष्य केले. शाळेचे मॅनेजर फा. सतिश कदम ह्यांनी महाराजांची धर्मनिरपेक्षता ह्यावर विचार मांडले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक फा. डॉमिनिक ह्यांनी कार्यक्रमाचा समारोप करत महाराजांचे जिवन गुणवैशिष्ट्ये म्हणजेच त्यांचे चातुर्य, दूरदृष्टिकोन, जाणता राजा, स्री-बद्दलचा आदर ह्याचा आढावा त्यांच्या भाषणातून घेतला. मारिया मॅडम ह्यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे