वांगी बुद्रुक ग्रामपंचायत निवड नुकिची तोप कडाळली…..

वांगी बुद्रुक ग्रामपंचायत निवड नुकिची तोप कडाळली…..
श्रीरामपूर तालुक्यातील पुर्व भागातील अत्यंत महत्त्वाची ग्रामपंचायत समजल्या जाणाऱ्या वांगी बुद्रुक गावाची ग्रामपंचायत निवडणूक नुकतीच जाहीर झाली असून मोठ्या संख्येने उमेदवारांची धावपळ सुरू झालेली दिसुन येत आहे.
या ग्रामपंचायत वर वर्चस्व स्थापित करण्यासाठी एक मेकांचे प्रतीस्पर्धी जिवाचे रान करून आपले उमेदवारी अर्ज भरण्यासाठी धावपळ करतांना दिसुन आले. ग्रामपंचायत सदस्य पदासाठी २३ तर सरपंच पदासाठी १० अर्ज दाखल झालेली आहे मिळालेल्या माहिती मधुन समोर आले आहे. तर छानणी होऊन किती उमेदवार निवडणूकी पात्र ठरतात. तसेच किती उमेदवार रिंगणात राहणार तर किती जण माघार घेणार तर या कडे पुर्ण गावांचे लक्ष लागुन आहे.
जनता सुज्ञ असून जनता काम करणारा उमेदवार निवडून देतील अशी अपेक्षा काही निवडणूक रिंगणात उभे असलेल्या उमेदवारांची आहे
तर पात्र उमेदवारांना मतदार जनता काय व कुणाच्या बाजुने कौल देणार या कडे सर्व उमेदवारांच्या तिरक्या नजरा राहणार आहेत. यात काही शंका नाही