विद्यार्थ्यांनी यश मिळवण्यासाठी प्रयत्नांमध्ये सातत्य व संयम ठेवावा- दादाभाई मगरे पोलीस उपनिरीक्षक

विद्यार्थ्यांनी यश मिळवण्यासाठी प्रयत्नांमध्ये सातत्य व संयम ठेवावा- दादाभाई मगरे पोलीस उपनिरीक्षक
टाकळीभान प्रतिनिधी : यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवावे व यश मिळे पर्यंत संयम ठेवावा असे प्रतिपादन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दादाभाई मगरे यांनी केले. व्हिज्युअल अभ्यासिका केंद्र व ग्रामस्थ टाकळीभान यांच्यावतीने मुंबई पोलीस सेवेमध्ये निवड झालेला अरुण गायकवाड याच्या निवडीबद्दल नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मगरे बोलत होते. कार्यक्रम प्रसंगी सरपंचपती यशवंतराव रणनवरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर एडीसी बँकेचे शाखाधिकारी अमोल लासुरे,. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते मुंबई पोलीस पदी निवड झालेले अरुण गायकवाड व त्याच्या आई-वडिलांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मगरे बोलताना पुढे म्हणाले की यश हे सहजासहजी मिळत नसून ते आपल्या प्रयत्नांची पराकाष्टा पाहत असते. व यशाला शॉर्टकट नसून त्याला मेहनत, परिश्रमा शिवाय पर्याय नाही. विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरला महत्त्व देऊन आपल्या जीवनाचे सार्थक करून आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे. शाखाधिकारी अमोल लासुरे म्हणाले की अरुण गायकवाड याने आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मिळवलेले यश हे सर्वांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. यावेळी राजेंद्र कोकणे म्हणाले की ग्रामीण भागामध्ये अभ्यासिका केंद्राची सुविधा उपलब्ध करून देणारे महेश शिंदे सर व प्रशांत जाधव सर यांचे अभिनंदन केले पाहिजे. त्यांच्या अभ्यासिका केंद्रामुळे येथील विद्यार्थी यशस्वी होत असून गावासाठी त्यांचे हे कार्य अनमोल आहे.
यावेळी सत्काराला उत्तर देताना अरुण गायकवाड यांने आपल्या कुटुंबीयांचे व अभ्यासिका केंद्राचे ऋण व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अर्जुन राऊत यांनी केले. सर्वांचे आभार महेश शिंदे यांनी मानले. कार्यक्रम प्रसंगी ग्रामस्थ दत्तात्रय मगर , अण्णासाहेब दाभाडे,गजानन कोकणे ,बंडोपंत बोडखे,अरुण बनकर, प्रशांत जाधव सर, बाळासाहेब गायकवाड, संदीप गांगुर्डे नितीन रणनवरे,बापूसाहेब साळवे, आदींसह ग्रामस्थ व तरुण युवक वर्ग व अभ्यासिका केंद्राचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.