आढळगाव जिल्हा परिषद गट आरक्षणासंदर्भात, महाराष्ट्र शासन राजपत्र

आढळगाव जिल्हा परिषद गट आरक्षणासंदर्भात, महाराष्ट्र शासन राजपत्र
आढळगाव जिल्हा परिषद गट आरक्षणासंदर्भात, महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक 8 सप्टेंबर 2006, गट क्रमांक त्या वेळचा 67 आढळगाव हा चुकीने नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला दाखवल्या गेल्याने आजचे हे आरक्षण पडले आहे, वास्तविक पाहता 2007 ते 2012 या कार्यकाळात आढळगाव गटाचे निवडून आलेले उमेदवार श्री अनिलजी ठवाळ हे होते ते अनुसूचित जाती मधून निवडून आलेले होते , राजपत्रातील चुकीमुळे आढळगाव गटावरती आरक्षण पडले आहे, आज जिल्हाधिकारी साहेब यांना पत्र देऊन चूक दाखवून दिली आहे, 1997 ते 2002 लीलाताई शिवराम सोनवणे ह्या अनुसूचित जाती महिला आरक्षणांमधून निवडून आल्या होत्या 2002 ते 2007 कुंडलिक दरेकर सर्वसाधारण जागेवरून निवडून आले होते, 2007 ते 2012 अनिलजी ठवाळ हे अनुसूचित जाती व्यक्ती मधून निवडून आले होते, 2012 ते 2017 दरेकर ताई नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला मधून निवडून आल्या होत्या, 2017 ते 2022 मध्ये पंचशीला ताई गिरमकर ह्या जनरल महिला मधून निवडून आले होत्या.
अनुसूचित जाती हे आरक्षण दोन पंचवार्षिक पूर्वीच आढळगाव गटावरती होऊन गेले होते त्यामुळे 2022 ला अधिनियम 1961 मधील कलम 12 उपकलम 1 तसेच कलम 58/1अ प्रमाणे व महाराष्ट्र जिल्हा परिषद जागांच्या आरक्षणाची पद्धत चक्रानुक्रम नियम 1996 नुसार व्हायला पाहिजे तसे आढळगाव गटासाठी कुठेच दिसून येत नाही त्यामुळे आढळगाव गटाचे आरक्षण हे सरळ सरळ चुकीचे आहे असे स्पष्ट होत आहे ..,.
– विजयशेंडे सरपंच परिषद तालुका अध्यक्ष श्रीगोंदा