टाकळीभान येथे हर हर घर तिरंगा उपक्रम

टाकळीभान येथे हर हर घर तिरंगा उपक्रम
स्वातंत्र्याच्या अमृत महौत्सवा अंतर्गत “हर घर तिरंगा” उपक्रम राबविण्यात येणार असून त्या अनूषंगाने नियोजन करण्याबाबत शुक्रवार दि.२९ जुलै रोजी ग्रामपंचायतीच्या स्व. गोविंदराव आदीक सभागृहात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी आर.एफ.जाधव यांनी “हर घर तिरंगा” या उपक्रमाची माहीती दिली. या उपक्रमा अंतर्गत गावातील १००० प्लस घरावर तिरंगा झेंडा(राष्र्टध्वज)उभारणी स्वयंस्फूर्तीने करावयाची आहे. राष्र्टध्वज खरेदी करून आपल्या घरावर संहीतेचे पालन करत राष्र्टध्वजाची उभारणी करावयाची आहे. ज्या ग्रामस्थांना तिरंगा झेंडा खरेदी करणे शक्य त्या सर्वाना टाकळीभान ग्रामपंचायत तिरंगा झेंडा उपलब्ध करून देणार आहे. “हर घर तिरंगा” उपक्रमाचे ड्रोनद्वारे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येईल. तरी सर्वांनी या ऐतीहासीक उपक्रमाचे साक्षीदार होण्याचा प्रयत्न करावा. असे आवाहन टाकळीभान ग्रामपंचायतीच्या वतीने या ग्रामसभेद्वारे करण्यात आले आहे.
याप्रसंगी सरपंच अर्चना रणनवरे, उपसरपंच कान्हा खंडागळे, लोकसेवा विकास आघाडीचे शिवाजी शिंदे, अशोकचे संचालक यशवंत रणनवरे, ग्रा.पं.सदस्य मयुर पटारे, माजी संचालक दत्तात्रय नाईक, माजी उपसरपंच भारत भवार, विलास दाभाडे, सुंदर रणनवरे, ग्रा.पं.सदस्य सुनिल बोडखे, ग्रामविकास अधिकारी आर.एफ.जाधव तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.