*कृषी व व्यापारविरोधी पक्ष नेते अजितदादा पवार परळी व अंबाजोगाई तालुक्यात पीक नुकसानीची करणार पाहणीमाजी पालकमंत्री धनंजय मुंडे ही राहणार सोबत*
परळी राज्याच्या विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार हे बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या समवेत रविवारी सकाळी 8 वाजल्यापासून बीड जिल्ह्यातील परळी, अंबाजोगाई आदी तालुक्यांचा दौरा करणार असून, ते जिल्ह्यात पावसाने व किडीच्या प्रादूर्भावाने नुकसान झालेल्या पिकांची थेट बांधावर जाऊन पाहणी करणार आहेत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजेश्वर आबा चव्हान यांनी दिली आहे.रविवारी अजितदादा पवार व माजी मंत्री धनंजय मुंडे हे सकाळी 9 वाजता प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेऊन या दौऱ्याची सुरुवात करणार आहेत. मागील काही दिवसात गोगलगाय व अन्य किडीच्या प्रादुर्भावाने सोयाबीन सह विविध पिकांचे मोठे नुकसान झाले होते त्याचबरोबर काही ठिकाणी कमी व अधिक पावसाने पेरणी केलेले बियाणे उगवलेच नाही तर काही ठिकाणी अधिकच्या पावसाने शेतात पाणी साठलेले आहे. कोणत्याही परिस्थितीत बहुतांश शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आहे, असे असताना सत्ता पक्ष शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला सध्यातरी उपलब्ध असल्याचे दिसत नाही, मात्र विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार व धनंजय मुंडे हे मात्र शेतकऱ्यांच्या बांधावर उतरून त्यांना आधार देण्यासाठी सरसावले असल्याचे पाहायला मिळते आहे.दरम्यान अजितदादा पवार व धनंजय मुंडे हे परळी नंतर सकाळी 10.15 वा. जवळगाव ता. अंबाजोगाई येथील पीक नुकसानीची पाहणी करून स्थानिकव् शेतकऱ्यांशी संवाद साधतील, त्याचबरोबर ते बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शेतकरी प्रतिनिधी व लोकप्रतिनिधी यांची परळी व अंबाजोगाई येथे निवेदने स्वीकारून त्यांच्याकडून तालुकानिहाय माहिती घेतील. अंबाजोगाई वरून पुढे ते लातूर मार्गे मुंबईकडे प्रयाण करणार असून, बीड जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यातील प्रत्यक्ष भेटी काही अपरिहार्य कारणांमुळे स्थगित करण्यात आल्या असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. राजेश्वर चव्हाण यांनी दिली आहे.
या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.