देश-विदेश

नागपूर मुंबई समृद्धी ऐतिहासिक महामार्गाचे लोकार्पण.

नागपूर मुंबई समृद्धी ऐतिहासिक महामार्गाचे लोकार्पण.

 

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग पहिला टप्पा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हरदिप सिंह पुरी, रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते नागपूर येथे संपन्न झाला. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण कोपरगाव (तीनचारी कोकमठान) इंटरचेंज येथे रविवारी आयोजित करण्यात आले होते.

              या प्रसंगी समृद्धी महामार्ग निर्माण होतांना ज्या शेतकरी बांधवानी जमिनी दिल्या,सहकार्य केले आणि हा शेती,दळणवळण,व्यापार,उद्योग यांची भरभराटी होणार महामार्ग पूर्ण होऊ शकला त्यांचे आभार मानले.या सह ज्या अंतर्गत समस्या हा महामार्ग निर्माण होताना झाल्या प्रामुख्याने बोगदे निर्माण झाले त्यात साचणारे पाणी,रस्त्याच्या दोन्ही कडेला पाण्याची समस्या झाल्याने शेतकरी बांधवांना होणारा त्रास बंद करण्याची व अंतर्गत रस्ते खराब झाल्याने त्याच्या दुरुस्तीची मागणी केली असता ३१ डिसेंबर पर्यंत यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन महामार्ग निर्माण अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमात दिले.

            याप्रसंगी आत्मा मालिक ध्यानपीठाचे महंत परमानंद महाराज, पालकमंत्री राधाकृष्ण विखे,उत्तर महाराष्ट्र प्रभारी विजय चौधरी,खा.सदाशिव लोखंडे,खा.सुजय विखे,आ.सिमताई हिरे, भाजपा प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर,शिवसेना कमलाकर कोते,नितीन दिनकर,राजेंद्र देवकर,भाजपा तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम,शहराध्यक्ष दत्ता काले,युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश पाठक यांच्यासह भाजपा,शिवसेना,

आर.पी.आय कार्यकर्ते शेतकरी बांधव उपस्थित होते

 

Rate this post
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे