डिजिटल मिडियाने सामान्य जनता व प्रशासनाची विश्वासार्हता जपली पाहिजे!*
*डिजिटल मिडियाने सामान्य जनता व प्रशासनाची विश्वासार्हता जपली पाहिजे!*
*डिजिटल मिडिया परिषदेच्या जिल्हास्तरीय बैठकीत एस. एम. देशमुख यांचे आवाहन*
*डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्या सर्वांनीच सामान्य जनतेच्या आणि प्रशासनाच्या विश्वासास पात्र राहण्याची गरज आहे. त्याशिवाय सोशल मीडियाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणार नाही. आज विनाकारण सोशल मीडियामध्ये कामे करणाऱ्यांना पाहून नाके मुरडली जातात, परंतु हे योग्य नाही. तेव्हा डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्यांनी आपली प्रतिमा उंचावण्याच्या दृष्टिकोनातून प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत. त्याशिवाय डिजिटल मीडियाकडे विश्वासार्हतेने पाहिले जाणार नाही. येणारा काळ हा डिजिटल मीडियाचा अर्थात सोशल मीडियाचा आहे, असे स्पष्ट मत मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त तथा पत्रकार संरक्षण कायद्याचे जनक एस. एम. देशमुख सर यांनी यावेळी व्यक्त केले*
*महाराष्ट्रात सर्वप्रथम बीड येथे डिजिटल मीडिया परिषदेची स्थापना करण्यात आली. दरम्यान दिनांक 4 नोव्हेंबर रोजी वडवणी येथे मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न*
*असलेल्या
डीजिटल मीडिया*
*मीडिया परिषदेच्या जिल्हा स्तरीय बैठकीचे*
*आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी*
*मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख सर बोलत होते*
*या बैठकीला डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य प्रमुख अनिल वाघमारे तसेच डिजिटल मीडिया परिषदेचे बीड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र सिरसाट उपस्थित होते. या बैठकीदरम्यान*
*नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष तसेच जिल्हा कार्यकारिणीतील सदस्यांना एस. एम. देशमुख सर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले*
*सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठमोठ्या प्रश्नांना हात घातला जात आहे. वर्तमान पत्र वेगानं काम करत होते, त्याच्या दुप्पट वेगाने सोशल मीडिया काम करीत असल्याने डिजिटल मीडियाची ताकद वाढली आहे. त्यामुळे मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मीडियाची दुसरी विग आपण स्थापना केली आहे. डिजिटल मीडिया परिषदेच्या माध्यमातून सर्वांना न्याय देण्याचे काम प्रभावीपणे केले जाईल. तुम्ही सर्वजण सर्वसामान्य नागरिकांपर्यंत योग्य माहिती पोहोचण्याचे जबाबदारी घेऊन न्याय देण्याचं काम केलं पाहिजे. यातून डिजिटल मीडियाचा वापर केला पाहिजे, असे उद्गार मराठी पत्रकार परिषद मुख्य विश्वस्त तथा पत्रकार संरक्षण कायद्याचे जनक एस. एम. देशमुख सर यांनी यावेळी व्यक्त केले. या महत्त्वपूर्ण जिल्हास्तरीय बैठकीसाठी जिल्हाभरातून प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त तथा पत्रकार संरक्षण कायद्याचे जनक एस. एम. देशमुख सर, डिजिटल मीडिया जिल्हाप्रमुख जितेंद्र सिरसाट, डिजिटल मीडिया परिषदेचे राज्यप्रमुख अनिल वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्त पत्र देण्यात आले. तसेच भविष्यकाळात मीडियाचे महत्त्व यावेळी सांगण्यात आले. भविष्यकाळात डिजिटल मीडियाचे महत्त्व किती असेल यावर देखील चर्चा सत्र संपन्न झाले. त्यानुसार आपल्याला काम करावे लागेल अशा पद्धतीने सुद्धा सूचना सर्व पदाधिकाऱ्यांना एस. एम. देशमुख सरांनी केल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी पत्रकार परिषदेचे वडवणी तालुका अध्यक्ष अँड. विनायक जाधव यांनी तर आभार प्रदर्शन डिजिटल मीडिया परिषदेचे वडवणी तालुका अध्यक्ष ओमप्रकाश साबळे यांनी व्यक्त केले*.
*डिजिटल मीडिया परिषदेच्या जिल्हा कार्यकारणीवर यांची झाली निवड*
*जिल्हा कार्याध्यक्ष मोरे**जिल्हा उपाध्यक्ष – विश्वंभर मुळे*जिल्हा उपाध्यक्ष – प्रतीक कांबळे*जिल्हा उपाध्यक्ष – संग्राम धनवे**बीड तालुका अध्यक्ष – अभिजीत पवार*वडवणी तालुका अध्यक्ष – ओमप्रकाश साबळे*आष्टी तालुका अध्यक्ष – संदीप जाधव*गेवराई तालुका अध्यक्ष – अविनाश इंगावले* केज तालुका अध्यक्ष – रामदास तपसे*अंबाजोगाई तालुका अध्यक्ष – नागेश अवताडे*धारूर तालुका अध्यक्ष – गोवर्धन बडे*