येथील शासकीय गट गावठाणकडे वर्ग करावे—मागणी

येथील शासकीय गट गावठाणकडे वर्ग करावे—मागणी
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील शासकीय गट गावठाणकडे वर्ग करण्यात यावे. अशी मागणी टाकळीभान लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
टाकळीभान येथील शासकीय गट नं. ३२, १८९, २४६, २४७, २५२, २५६, २८६, २८७ या गटांचे पंचनामे झाले असून त्याचा अहवाल शासनाकडे पाठविला आहे. तरी सदर गटाचा प्रश्न शासकीय पातळीवर लवकरात लवकर मार्गी लावून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी. जेणेकरून गावातील प्रलंबीत घरकुलाचा प्रश्न मार्गी लागेल. अशी मागणी अशोकचे माजी अध्यक्ष ज्ञानदेव साळूंकके, लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष शिवाजीराव शिंदे, ग्रा.पं.सदस्य मयुर पटारे, सुनिल बोडखे, माजी संचालक दत्तात्रय नाईक, संचालक यशवंत रणनवरे, लोकसेवा विकास आघाडीचे उपाध्यक्ष रावसाहेब वाघुले, शंकर पवार, उत्तम पवार, भाऊसाहेब पटारे, बाळासाहेब आहेर, संजय पटारे, शिवाजी पवार आदींनी महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.